विवेकानंद विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली पाणी बचतीची शपथ . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 मार्च 2019

विवेकानंद विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली पाणी बचतीची शपथ .


सेलू / प्रतिनिधी
 येथील विवेकानंद विद्यालयात जागतिक जलदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पाणी बचतीची शपथ घेतली .प्रशालेतील शिक्षक विजय चौधरी यांनी ही शपथ विद्यार्थ्यांना दिली.
२२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणुन साजरा करण्यात येत असतो .पाण्याचे महत्व विशद करणारी चित्रे विद्यार्थ्यांनी काढली.
श्रीपाद जोशी यांनी जलदिनाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली ते पुढे म्हणाले की ,आज पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट झाली आहे .शहरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे प्रदूषण होत आहे , शेतीला सिंचनासाठी पाण्याचा तुटवडा ,जलदगतीने भूजलपातळीत होणारी घसरण, वार्षिक सरासरी पर्जन्य घट ,रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या वापरामुळे होणारे प्रदूषण या सर्व बाबी लक्षात घेता नजीकच्या काळात जल संकटाची युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण गरजेनुसार पाणी वापरायला हवे असे ते म्हणाले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपाली भावसार, चेतन नाईक ,सतीश भुजबळ, संध्या शोभने, विनोद मंडलिक यांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें