गंगापूर-भजनसम्राट "योगेश मोरे"यांचा संत तुकाराम बीजनिमित्त "गजरश्रीहरिचा" सुरमय कार्यक्रम संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 मार्च 2019

गंगापूर-भजनसम्राट "योगेश मोरे"यांचा संत तुकाराम बीजनिमित्त "गजरश्रीहरिचा" सुरमय कार्यक्रम संपन्न.


योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापूर
दि.22.03.2019

गंगापूर तालुक्यातील नवाबपूर येथे आज संत तुकाराम महाराज बीजनिमित्त  पत्रकार तथा भजनसम्राट योगेश मोरे यांचा बहारदार असा सुराने नटलेला "गजर श्रीहरिचा" कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.भजनसम्राट योगेशजी मोरे यांनी माझे माहेर पंढरी,तुकोबाची अभंगवाणी,जे का रंजले गांजले,हेचि थोर भक्ती आवडती देवा,पंढरी निवास सखा पांडुरंग आदी अभंग सादर करून रसिकांची मने जिंकली.यावेळी साथसंगत दिपक राऊत,केशव शेजुळ तसेच मृदंगसाथ बबन महाराज सजगुरे,टाळाची साथ भाऊसाहेब चव्हाण,मोहन थोरे यांनी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच नंदू सजगुरे,साईनाथ वने,चंद्रभान जाधव,चांगदेव चव्हाण,गंगाधर ठोंबरे,संतोष जाधव,अमोल पावणे,गणेश पावणे,पंढरीनाथ चव्हाण,सारंगधर चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.महाप्रसादाचे आयोजन अशोक चव्हाण यांच्यातर्फे करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें