सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा घाटात एका 35 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी (दि. 21) दुपारी 4 वाजेच्या सुमारास उघडीस आली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 मार्च 2019

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा घाटात एका 35 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी (दि. 21) दुपारी 4 वाजेच्या सुमारास उघडीस आली.

सिल्लोड, प्रतिनिधी :

      पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वनविभागाचा एक कर्मचारी गुरुवारी दुपारी घाटनांद्रा घाटात फिरत असतांना दरीतून धुर निघत असल्याचे निदर्शनास आले. हे पाहून आग विझवण्यासाठी ते घुराच्या दिशेने निघाले असता दरीच्या कडेवरील झाडाला एका इसमाचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला. त्यांनी ही माहिती तात्काळ सिल्लोड ग्रामीण पोलिसांना दिली. माहिती मिळताच बीट जमादार के. एम. सोनवणे यांनी घटनस्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह श्वविच्छेदनासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

      दरम्यान सदर इसमाच्या अंगावर फक्त अंडर पैंट होती. आत्महत्ये अधी अंगावरील अंडर पैंट वगळता सर्व कपडे काढून पेटवून देत दरीत फेकले असावे, त्यामुळेच दरीतून घूर निघत असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. अंगावर कपडे तसेच एक ही वस्तु आढळून न आल्याने सदर इसमाची ओळख पटु शकली नाही. साडेपाच फुट उंची, रंग गोरा असे इसमाचे वर्णन आहे. ओळख पटवण्यासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयाच्या  श्वविच्छेदन गृहात ठेवण्यात आलेला आहे. सदर इसमाची ओळख पटल्यास सिल्लोड ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें