उपळी येथे विविध विकास कामांचे उदघाटन;विकास कामांच्या मुल्यमापनावरच जनतेचा विश्वास -आ. अब्दुल सत्तार; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 5 मार्च 2019

उपळी येथे विविध विकास कामांचे उदघाटन;विकास कामांच्या मुल्यमापनावरच जनतेचा विश्वास -आ. अब्दुल सत्तार;

सिल्लोड : प्रतिनिधी (दि.०५) - काँग्रेस नेतृत्वात शेतकरी - शेतमजुर नागरिकांच्या विविध अडी अडचणी समस्या जाणून घेतल्या जातात. विविध विकास योजना राबवून परिसराचा विकास साधला जात आहे. विकास कामांच्या मुल्यमापनावरच जनता मतांच्या माध्यमातून आपले स्नेह व विश्वास नेतृत्वावर टाकतात. भुलथापा मारुन राजकारण करणाऱ्यांना जनता मतदानातून धडा दाखविल्याशिवाय राहात नाही. सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीतून विरोधकांना जनतेने दाखवून दिले असल्याचे मत माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. सिल्लोड तालुक्यातील उपळी येथे वचनपुर्ती करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
सिल्लोड तालुक्यातील उपळी येथील ग्रामस्थांना परिसरातील विविध विकास कामांविषयीची वचनपुर्ती करीत या कामांना मंजुरी देण्यात आली असुन जिल्हा परिषद अंतर्गत ३०५४ हेड उपळी गावाजवळील अंजना नदीवरील पुलांचे बांधकाम (२७ लक्ष) , अंजना नदीवरील कोल्हापुरी बंधा-याचे नविन दरवाजे बसविणे (१८ लक्ष), अंजना नदीवरील मांडगाव - दिडगाव - भराडी रोडवरील फरशी पुलाचे व रोडचे बांधकाम करणे (२२.०५ लक्ष), जिल्हा परिषद अंतर्गत ५०५४ हेड उपळी - वाघधावाडी ते बोरगाव बाजार तीन किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामांचे उदघाटन माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार,जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपळी येथील ग्रामपंचायत - ग्रामस्थांच्या वतीने माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे आदि मान्यवरांचे फटाक्यांच्या आतिशबाजीत वचनपुर्ती करण्यात आल्याबद्दल स्वागत करण्यात आले.
यावेळी सरपंच मिराबाई काशिनाथ सुरडकर,
उपसरपंच भगवान अंबादास नाईक ग्रामसेवक
गुंजकर यांच्यासह प्रविन शेजुळ , गणपत औटे, सुभाष शेजुळ, राजेन्द्रं शेजुळ, राजु सुरडकर , माजी सरपंच जनार्धन शेजुळ , विठ्ठल गायकवाड , योगेश फोलाने , मचिन्द्रं शेजुळ , दत्तु पाटील , गणेश शेजुळ, उमेश शेजुळ, नारायण शेजुळ , योगेश फोलाने , काशिनाथ सुरडकर, प्रभाकर शेजुळ, बाजीराव औटे ,
अशोक गायकवाड , गणेश पवार , रंगनाथ मिरगे , दिपक शेजुळ , गंभीर शेजुळ , दिनकर शेजुळ ,बाळु शेजुळ , सोमिनाथ पाटील , कमलेश शेजुळ , पंकज काकडे , रुषीकेश शेजुळ , विनोद शेजुळ , विशाल शेजुळ , राजु फोलाने , जनार्धन चव्हाण ,
शंकर फोलाने , अक्षय गायकवाड , सागर चव्हाण  यांच्यासह उपळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें