शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव.
नाशिक महामार्गावर सावळीविहीर फाटा येथे सोमवारी दुपारी मालवाहतूक पिकअप व्हॅन व मोटारसायकल च्या अपघातात एक जण ठार झाला.
या अपघाताची माहिती अशी की, शिर्डी नाशिक महामार्गावर सोमवारी सावळीविहीर फाट्याजवळ झगडी फाट्याकडुन भाऊसाहेब परशुराम पवार राहणार- बेलापूर, तालुका कोपरगाव हे आपल्या मोटारसायकल वरून येत असताना त्यांच्या मोटारसायकल ला मालवाहतूक पिकअप व्हॅनने जोराची धडक दिल्याने मोटारसायकल स्वार परशुराम पवार हे जबर जखमी झाले.
तेव्हा स्थानिकांनी शिर्डी येथील साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता तत्पुर्वीच परशुराम पवार यांचा म्रूत्यु झाला.
पवार हे एका समाज मेळाव्याहुन येत असल्याची येथे चच्र्चा होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें