माजी सैनिकांनी दिले राष्ट्रभक्तीचे धडे सेलू येथील नूतन विद्यालयाचा उपक्रम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 5 मार्च 2019

माजी सैनिकांनी दिले राष्ट्रभक्तीचे धडे सेलू येथील नूतन विद्यालयाचा उपक्रम.

सेलू प्रतिनिधी.
सेलू,   येथील नूतन विद्यालयात इयत्ता नववीच्या  अभ्यासक्रमा अंतर्गत संरक्षण शास्त्र या विषयावर मार्गदर्शन करतांना माजी सैनिकांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्तीचे धडे दिले.
मंगळवारी दि.५ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, माजी सैनिक कॅप्टन जे.पी.शर्मा, नायक एस.के.महाजन, विजय देशमाने, सहायक पोलिस  उपनिरीक्षक माधव लोकुलवार,
हवालदार भागीरथ गायकवाड, ज्ञानेश्वर कावळे, उपमुख्याध्यापक अशोक गाजरे, पर्यवेक्षक रामकिशन मखमले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माधव लोकुलवार यांनी पोलीस दलातील भरती व  पदांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, तर माजी सैनिक महाजन यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, राष्ट्रा अंतर्गत व बाह्य सुरक्षा याबद्दल माहिती दिली. ज्ञानेश्वर कावळे, भागीरथ गायकवाड यांनी सैन्यातील शिस्त, वेळ  आज्ञापालन कशाप्रकारे करावे तसेच सैनिक ते अधिकारी वर्ग बदल याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हास्तरीय विजयी खेळाडूंना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक देविदास सोन्नेकर,  सूत्रसंचालन गणेश माळवे, सतिश नावाडे, तर आभार प्रंशात नाईक यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें