सिल्लोड (प्रतिनिधी)दि 19/03/2019.
सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील नागरिकांना अनेक दिवसांपासून राशनच मिळत नसल्याने येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
दुष्काळाची दाहकता खुपच गंभीर बनत चालली असुन सराटी येथील अनेक कुटूंबे कामांचे शोधार्थ शहराकडे वळली आहेत. प्रशासनाकडून रोजगार हमी योजनांतर्गत एकही काम उपलब्ध करण्यात आले नसल्याने आर्थिक कचाट्यात सापडलेल्या मजुरांची दयनीय अवस्था झाली आहे. कसे बसे राशनपुरते कमवायचे अन् संसाराचं रहाटगाडगं चालवायचं असीच दयनीय अवस्था येथील अनेक कुटूंबांची झालेली असतांनाच राशनपासुन अनेक कुंटूंबॆ वंचितच ठेवले जात आहे. अनेकांकडे राशनकार्डच नसल्याने राशनपासुन वंचित राहावे लागत आहे. अनेकदा निकृष्ठ दर्जाचा गव्हू गोरगरिबांच्या माथी मारल्या जात आहे.राशनची जास्त दराने विक्री करुन गोरगरिबांची एकप्रकारे आर्थिक लुटमारच केल्या जात आहे. राशन कार्ड नसल्याने अनेकांना राशनपासुन वंचित राहावे लागत आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे गोरगरिबांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे तर दुसरीकडे राशनच मिळत नसल्याने सराटी येथील नागरिकांच्या नशिबी धान्यांअभावी कुटूंबांचा उदरनिर्वाह करायचा तरी कसा अशाच संकटात येथील गोरगरिबांना वावरावे लागत आहे. सराटी येथील अनेक कुटूंबियांना राशनपासुन वंचित राहावे लागत असल्याने येथील अनेक कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें