कनकोरी ग्रामपंचायतीकडून केंद्रीय माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन.
योगेश मोरे(प्रतिनिधी)
गंगापुर
दि.19.03.2018
भ्रष्टाचार कमी होऊन , सामान्य माणसाला सुरू असलेला,ग्राम पंचायत कारभार कळावा यासाठी केंद्रीय माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये पारित करण्यात आला. या अनुषंगाने माहिती अधिकार कार्यकर्त्या निर्मला गायकवाड यांनी सदर ग्रां.प. कडे विविध योजनावर झालेल्या खर्चाबाबत जाणून घेणेकामी , या ग्रां. पं. तिकडे रजिस्टर पोस्टाने माहिती अधिकार सादर केला . दि .4 फेब्रुवारी 2019 ते 7 फेब्रु 2019 पर्यत सदर रजिस्टर देणेकामी तेथील नियुक्त पोस्टमन हे नियमित ग्रां पं. कार्यालयात गेले . परंतू त्यांना कार्यालयाला कुलूप आढळून आले , म्हणूनच त्यांनी भेट नाही;असा शेरा रजी. पाकिटावर मारला .
दि . 8 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू असलेल्या ग्रां. पं. कार्यालया किनगावला सदर पोस्टमनने माहिती अधिक्काराचे रजिस्टर पाकीट ग्रामसेवकाकडे दिले असता त्यांनी घेण्यास नकार दिला .
म्हणजेच त्यांनी केंद्रीय माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करत या कायद्याची चेष्टा च केली . माहिती अधिकार अर्जान्वये विहित वेळेत माहिती न देणे बेकायदेशीर असून त्याला आर्थिक दंडाचे प्रावधान आहे . त्याचप्रमाणे माहिती अधिकार घेण्यास नकार देणे हे कायदेशीर कसे ?
एकूणच ग्रामसेवकाच्या या गैरवर्तुणुकीतून त्यांचा ग्रांमपंचायत कारभार हा भ्रष्ट्राचारयुक्त कि भ्रष्ट्राचारमुक्त असा सवाल निर्माण झाला आहे . तसेच याआधी या ग्रामसेवकाने अशा प्रकारे माहिती अधिकार अर्जाला नकार देण्याचे किती प्रकार केले याचाही उलगडा होणे गरजेचे आहे . गावाचा विकास करणारा तो ग्रामविकास अधिकारीला माहिती अधिकार अर्ज घेण्यास नकार देण्याची भकास व बेकायदा वागणूक कितपत शोभते ? या घडलेल्या गैरप्रकाराचा पोवाडा प्रथम अपिलिय अधिकारी तथा गट विकास अधिकारी , पं .स . गंगापूर समोर प्रथम अपिलांच्या सुनावणीदरम्यान निर्मला गायकवाड गाणार आहेत . तसेच याबाबत लेखी तक्रार माहिती आयुक्त , खंडपीठ, औ. बाद व जेष्ठ समाजसेवक आणा हजारे यांच्याकडेही लेखी तक्रार सादर करणार आहेत .


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें