जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहि ते पर्यंत आंदोलनापासुन परावृत होनार नाहि.mdo संघटना..
प्रतिनिधी परभणी दि.08/03/2019.
परभणी :सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून मागील तीन वर्षापासून विविध कल्याणकारी योजने अंतर्गत अनुदान वाटप होत नसल्याने दि . ०८ / ०३ / २०१९ रोजी संघनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या कड़े मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने देण्यात आले होते या निवेदनात असे नमुद करण्यात आले होते की परभणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून बांधकाम कामगारांना विविध योजनेअंतर्गत अनुदान प्रलंबित आहे त्यांना लोकसभेच्या २०१९ निवडणुक आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता असतांन असुन आचारसंहिता लागू होण्यापुरवी प्रलंबित असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचे अनुदानात तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे व कार्यालयातील अधिकारी - कर्मचा - यांकडून वेळकाढू धोरण , दप्तर दिरंगाई , विविध अर्थसहाय्य कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी गेल्या तीन वर्षापासून होत नसल्याने संघटनेकडून लोकशाही मार्गाने आंदोलने , निदर्शने उभारण्यात आली होती . इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या हिताच्या अर्थसहाय्य अनुदान कामगारांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन *मायनॉरेटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेला* दिले होते . परंतु बांधकाम कामगारांचे विविध योजनेअंतर्गत अनुदानाच्या हजारो फाईल प्रलंबित आहेत . सबंधित अधिका-याकडून लाभार्थ्यांची दिशाभूल करून त्यांची अनेक वर्षापासून विविध कल्याणकारी योजनेच्या अनुदानात विलंब होत असल्यामुळे तसेच निधीची उपलब्धता असूनही या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी व हलगर्जीपणाच मुळे या वंचित कामगारांना नाहक त्रास सोसावा लागत आहे . | सदरील सर्व बाबी लक्षात घेता.
संबंधीत प्रकरणीआज संघटनेने सकाळी 10 वाजता बेमुदत आंदोलनाली सुरुवात झालेली असुन या प्रकरणी सां.6 वाजता कामगार कार्यालयातुन आंदोलनास परावृत होण्याचे लेखी आश्वासन दिले परंतु संघटनेच्या वतिनेने तो फेटाळुन लावला असुन जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होनार नाहि तो पर्यंत आम्हि आंदोलनापासुन परावृत होनार नाहि असे सांगण्यात आले आहे. या आंदोलनास विविध राजकिय पक्ष व सामजिक संघटनेच्या वतिने पाठिंबा व भेट देण्यात आली आहे व सदरिल आंदोलन हा सुरुच आहे.



कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें