योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापुर
दि.21.03.2019
गंगापूर तालुक्यातील प्रसिद्ध पत्रकार योगेश मोरे यांचा सत्कार गंगापूर तालुक्यातील सिद्धापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने माननीय मुख्याध्यापक कडूबा हारदे सर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक हारदे सर म्हणाले की,पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून,सर्वसामान्य जनतेच्या समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार हे अत्यन्त महत्वाची भूमिका बजावत असतात.तसेच पत्रकार योगेश मोरे यांच्या सामाजिक बातम्या बघता अतिशय काळजीपूर्वक शब्दांचा सखोल असा उपयोग करून सामाजिक प्रश्नांना सखोल न्याय देण्याचा प्रयत्न ते करतात आणि याही पुढे असेच कार्य समाजासाठी करत राहून आपल्या महाराष्ट्र राज्याचं नाव मोठं करा असे विधान हारदे सर यांनी पत्रकार योगेश मोरे यांच्या सत्कारावेळी केले.यावेळी शाळेतील
पदवीधर शिक्षक भगवान हिवाळे,विजय पठारे सर,बाळासाहेब घोडे सर,सुनील थोरात सर आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें