सेलू प्रतिनिधी
सेलू शहरातील राजीव गांधी नगरातील २३ वर्षीय संतोष कैलास सोनवणे हा अल्पवयीन मुलींची छेड करून त्यांना आत्महत्येस चिथावणी देणे, एकट्या महिलेवर हल्ला करून जबरीने लूट करणे, यौन शोषणासाठी बालिकेवर अत्याचार करणे आदी कृत्यांमुळे एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करत कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. सोनवणे याने लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून
धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करून त्यास ईच्छापूर्वक दुखापत करणे, फौजदारीपात्र धाकपदशा दाखविणे, शांतता भंग घडविण्याच्या उद्देशाने अपमान करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे मागील दोन वर्षापासून सातत्याने पोलीस ठाणे सेलू आणि पूर्ण परिसरात करीत आहे. त्याच्याविरुद्ध मागील दोन वर्षात गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल झालेले आहेत. सर्वसामान्य नागरिकात आणि महिलांमध्ये त्याची
दहशत निर्माण झाल्याने त्याच्यापासून पिडीत झालेल्या व्यक्ती त्याच्या विरुद्ध तक्रार करण्यासही धजावत नाहीत व समाजासाठी तो अत्यंत धोकादायक ईसम झाल्याचे दिसून आले. त्याला प्रचलित कायद्याचा आदर वा भिती राहिलेली नाही व प्रतिबंधक कार्यवाहीचा त्याच्यावरील परिणाम निष्फळ ठरत असल्याने, त्याच्या धोकादायस प्रवृत्तीस आळा घालणे आवश्यक झाल्याने सेलूचे पोलीस निरिक्षक यांनी त्यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करावे असे प्रस्ताव पोलीस अधिक्षक यांना सादर केला. प्रस्तावाची पडताळणी व छानणी करून प्रस्ताव योग्य असल्याने जिल्हा
दंडाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आला. जिल्हा दंडाधिकारी
यांचे एपीडीए कायद्यांतर्गत संतोष कैलास सोनवणे यांच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कार्यवाही करणे आवश्यक असल्याची खात्री व समाधान झाल्याने 19 मार्च रोजी त्यास स्थानबद्ध करण्याचे आदेश निर्गमित केले या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक गुन्हे शाखा व सेलू पोलीस ठाणे येथील पथकाने केलेली असून धोकादायक ईसम संतोष कैलास सोनवणे यास सेलू येथून स्थानबद्व करून औरंगाबाद येथील हरसुल कराग्रह येथे दाखल केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें