शितलच्या शाळेत येण्यामुळे सर्व चिमुकले आनंदित झाली.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 21 मार्च 2019

शितलच्या शाळेत येण्यामुळे सर्व चिमुकले आनंदित झाली..

" मुलांच्या खळाळत्या जीवनात शिक्षक प्रवाही असायलाच हवेत. नाहीतर पानगळी प्रमाणे अनेक लेकरं शिक्षणापासून गळून जातील.”*

*शितल अगदी नावाप्रमाणेच! अतिशय गुणवान लेकरू. मितभाषी असणारी शितल आमच्या वर्गातील सर्वांना आवडणारी. घरची परिस्थिती अतिशय हालाखीची. शितलचे आई वडील ऊसतोडीसाठी गावोगाव फिरत आहेत. त्यामुळे घरचा कारभार शितलवरच. आपला छोटा भाऊ सांभाळून घरचा व्यवहार तिलाच पाहावा लागतो. 'आई-वडिलांशिवाय मुले एकत्र राहणं ही कल्पनाच करवत नाही.' परंतु शीतल व तिचा भाऊ अशाही परिस्थितीत एकमेकांना आधार देत राहत आहेत. तांड्यावरील शाळेतील मुलं केवळ शितलच नव्हे तर रेश्मा, गोकरणा ,अश्विनी ,छाया, करण, अजय ,अर्चना अशा एक नव्हे तर कितीतरी मुलांची आई वडील वडील सध्या ऊस तोडणीसाठी व कामधंदा निमित्ताने गाव सोडून गेलेली आहेत.*

    *तसं तर शितल रोजचं काम उरकून शाळेत येत असे. परंतु मागील काही दिवसांपासून तिचं शाळेत येणे बंद झालं होतं. माझ्या मनाला सतत काळजी वाटू लागली होती. वर्गात ज्या ठिकाणी शीतल बसत होती ती जागा मला सतत शितल नसण्याचं शल्य दर्शवित होती. चार दिवस झाल्यानंतर मुलांशी संवाद केला तर मुलांनी शितल विषय सांगायला सुरुवात केलं. की,सर शितल सध्या दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजाने कामाला जात आहे. सध्या आमच्या परिसरामध्ये हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. या हळदीच पीक काढणी सध्या सुरू आहे.  या कामांमध्ये शितल स्वतःहून जात आहे असं सांगितलं जात होतं. शितल न येण्याचं शल्य फक्त मलाच नव्हतं तर माझ्या वर्गातील सर्व चिमुकल्यांना होतं .कारण शितल खरंच गुणवान लेकरू आहे.......*

     *आमच्या पार्डी या गावाचा मागील भूतकाळ पाहता मुलींचे सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं की त्यांच्या आई-बाबांना मुलीचा लग्न करून तिचा संसार थाटणे व जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर थाटणे हाच एक मार्ग शिल्लक त्यांना दिसतो. मागील अशा न उमललेल्या कळ्यांचा संसार कसा चालला असेल किंबहुना संसार कसा थाटला असेल माहीत नाही. किमान माझ्या समोरील या चिमुकल्या मुलींवर शिक्षणापासून बाजूला जाऊन एवढ्या लवकर त्यांच्या नशिबात हा संसाराचा रहाटगाडगं येऊ नये ही तळमळ सतत आहे... यावर एकच उपाय म्हणजे या लेकरांना शिक्षणाच्या प्रवाहात वाहत ठेवणं हाच आहे. तसं पाहता शितल अभ्यासात वाचन ,लेखन व सर्व शालेय उपक्रमांमध्ये  उत्तम काम करणारी मुलगी. व तीच हे असचं मध्ये शिक्षण बंद होणार म्हणजे आम्हा सर्वांसाठी नाहीतर तिच्या स्वतःच्या भवितव्याचा मार्ग बंद करणे होय. परंतु आज मनापासून ठरवलंच होतं की आपण या लेकराला जाऊन भेटायचं आणि तिला व्यवस्थित समजावून सांगायचं.*

   *आज लवकरच शितलच घर गाठलं. कारण रोजानं जायचं म्हणजे ती लवकरच दुसऱ्याच्या शेतात जात असेल असा अंदाज बांधला. काजल अजय, विष्णू ,निकिता ,राधा ,शिवानी सर्वजण मिळून रामनगर तांडा येथे घरी गेलो. शितल आपल्या घरच्या कामांमध्ये गुंतलेली होती. आम्हा सर्वांना पाहून तिला ओशाळल्यासारखं झालं. मी सर्वजण तिच्या अंगणातच बसलो. शीतल ने संस्कृतीप्रमाणे पाहूनचारही केला. मितभाषी शितल खाली मान घालून उभी होती. शाळेत न येण्याची कारणे विचारू लागलो. मात्र शीतल काहीही बोलत नव्हती. तिच्या न बोलण्यातून आम्हा सर्वांना सर्व काही समजत होतं. निकिता काजल, अजय या सर्व मित्रांनी तिला शाळेत येण्याविषयी विनंती केली. तुझ्याशिवाय कसं आम्हाला करमत नाही असेही ते बोलू लागले. सर्वाचीे विनंती शीतल  मान देऊन मी उद्या येण्याचं कबूल केलं. पण आम्ही सर्वांनी तिला आजच आणि आत्ताच सोबतच तू शाळेतआलं पाहिजे असा हट्ट धरून बसलो. आम्हा सर्वांच्या हट्टापुढे शितल काही चालले नाही. व शीतल आमच्या सोबत येण्यास निघाली.*
        *एवढ्याही सगळ्या सोपस्कारानंतर शितल न मात्र आपल्या गुरुजींचा पाहुणचार करायचा विसरली नाही. तिनं  स्वतःच्या हाताने आमच्या सर्वांसाठी चहा बनवला. आम्ही सर्वजण चहाचा आस्वाद घेता घेताच शितल शाळेत येण्याच्या आनंदात हर्षित होऊन गेलो. शितल शाळेत आलेली पाहून इतर सर्व वर्गातील विद्यार्थी आनंदी झाले. शितल च्या शेजारी बसणारी वैशालीला तर फार आनंद झाला.*

*“प्रत्येक कळीत जागत असतो ,*
*निर्धार फुल होण्याचा ,*
*दिमाखाने हसण्याचा अन,*
*सुगंधाने दरवळण्याचा ........."*

*मात्र परिस्थितीच्या पुढे मनुष्य किती हतबल असतो याची जाणीव फक्त आमच्यासारख्या तांड्यावरील मुलांच्या डोक्यावर अवेळी लादलेला हा प्रौढपणाचा डोलारा त्यांचे बालपण हिरावून घेतो. याचेही भान राहत नाही. त्यांना परिस्थितीने दिलेल्या सर्वच गोष्टींचा स्वीकार करून पुढं चालत राहावं लागतं ,चालत राहावं लागतं..........*

*"शाळा ,शिक्षक आणि मुले यांच्या प्रेममय संबंधाच्या किनाऱ्यावर भरत असते"*

हेच अगदी खर आहे.

अशा कितीतरी शितल आज अवेळी लागलेल्या प्रौढपणा च्या ओझ्याखाली शाळेपासून वंचित होत आहेत. त्या शाळेत येत नसतील तर किमान शाळा त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे.............

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें