औरंगााबाद : लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी न दिल्याने सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला होता. ‘मला लोकांमध्ये जाऊन नशीब अजमावयाचे आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणारच,’ असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली होती. त्यानंतर काही तासातच काँग्रेसने औरंगाबाद आणि जालन्यातील उमेदवार बदलले आहेत.
लोकसभेच्या औरंगाबाद मतदार संघातून कॉंग्रेसतर्फे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र आता ती रद्द करण्यात आली असून अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जालन्यातून विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र आता ती रद्द करण्यात आली आहे. जालना येथून कल्याण काळे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. यापूर्वी काँग्रेसने चंद्रपूरमधून विनायक बांगडे, भिवंडीतून सुरेश टावरे आणि लातूरमधून मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी दिली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें