सिल्लोड प्रतिनिधी-दि . २१ रोजी मौजे घाटनांदा वार गट नं . ८३८ मधील वन विभागाचे कार्यक्षेत्रातील डोगरदरीमधील एका ४० वर्षीय पुरुष गळफास घेऊन लटलेल्या अवस्थेत मिळुन आल्याने ग्रामीण पोलीसांनी अथक परिश्रम घेऊन प्रेत दरीच्या बाहेर काढुन उप जिल्हा रुग्णालय सिलोड येथे दाखल केले होते.पोलीसांनी मयताची ओळख पटविण्यासाठी सर्व इलेक्ट्रानिक मीडिया तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसिद्धी दिली असता त्यावरुन आसडी त सिल्लोड येथील गणेश कौतिक गव्हाणे हे नातेवाईकांसह दि . २४ रोजी पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण येथे आले.मयत इसम हा कौतिक खंडू गव्हाने वय ४८ वर्षे रा.असाडी ता. सिल्लोड यांचेच असल्याचे ओळखुन सांगितले आहे . सदरचे प्रेत अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.मयत कौतिक खंडू गव्हाणे वय ४८ वर्षे हे मुळचे आव्हाणा ता . भोकरदन येथील असून काही वर्षे ते लिहाखेळी येथे राहत होते . त्यांना एक मुलगा,एक विवाहित मुलगी,सुन असा परिवार असून त्यांची पत्नी दिड वर्षापुर्वी मयत झालेली आहे. दि . २१ रोजी मयत हा सिल्लोड येथे आला व मुलगा गणेश याला भेटून घराची चावी देऊन मी पोटाच्या उपचारासाठी मुंबईला जात आहे . असे सांगितले परंतु तो मुंबईला न जाता सदर इसम हा दुपारी तीन वाजेचे सुमारास घाटनांद्रा वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील डोंगरदरीमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत धनराक श्री बावकर यांना दिसला . त्यांनी घाटनांद्रा येथील गांवकरयांना सांगुन पोलीसांना माहिती दिली . मयताने गळफास घेण्यापुर्वी अंगावरील कपड़े जाळून टाकले व नंतर दरीमध्ये फेकले व दरीतील झाडाला गळफास घेतला . दरीत जळालेल्या कपड़े फेकले असता जंगलातील गवत पेटल्याने त्याचा धूर दिसल्याने बावसकर यांना वाटले की दरीत आग लागली म्हणून ते पाहण्यासाठी गेले असता त्यांना सदरची घटना उघडकीस आली होती.पुढील तपास पोलीस अधिक श्रीमती मोक्षदा पाटील मॅडम,अपर पोलीस अधिक्षक गणेश गांवडे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पो . उप. नि पोलीस हवालदार विष्णु पन्हाळ,पोलीस नाईक विलास सोनवणे,काकासाहेब सोनवणे,विठ्ठल डोके,समाधान काळे, संतोष धुनावत हे करीत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें