कामगार कार्यालयाच्या गलथान कारभारा विरोधात उभारलेल्या आंदोलनास एमडीओ संघटनेच्या मागणीला यश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 14 मार्च 2019

कामगार कार्यालयाच्या गलथान कारभारा विरोधात उभारलेल्या आंदोलनास एमडीओ संघटनेच्या मागणीला यश.

 लेखी आश्वासन नंतर बेमुदत आंदोलन मागे.

प्रतिनिधी.दि.13/03/2019.
परभणी.येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून मागील तीन वर्षापासून विविध कल्याणकारी योजने अंतर्गत अनुदान वाटप होत नसल्याने मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 08/ 03 /19 रोजी संघनेच्या वतीने कामगारांच्या न्याय हक्कासाठी  बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते बेमुदत आंदोलनाचा पाचव्या दिवशी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून साहाय्यक कामगार आयुक्त एम.ए.सय्यद   सरकारी कामगार अधिकारी अ.अ.देशमुख यांनी  एम.डी.ओ संघटनेच्या दिलेल्या निवेदनावर च्या मुद्दयावर सविस्तर चर्चा करण्यात आली सेवानिवृत्त निवृत्त अधिकारी गट अ;गट ब; यांना पुढील आदेश पुढील आदेश येईपर्यंत अधिकारी कर्मचारी कमी करण्यात आले  आसंहितेमध्येप्रलंबित असलेल्या मजुरांच्या फायली निकाली काढण्यात यावे, नवीन नोंदणी, किट बाॅकस वाटप, करण्यात यावे असे संघटने मागणी केली याबाबत माननीय जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र देऊन मार्गदर्शन मागविण्यात  येईल असे सरकारी कामगार  अधिकाऱ्यांनी सांगितले!
विविध योजने अंतर्गत अर्थसहाय्य लाभ देण्यासाठी नियमबाहय  हे कागदपत्रांची मागणी त्रुटी काढण्याचे काम करीत आहेत  याविषयी सरकारी कामगार अधिकारी यांनी सांगितले की मंडळाने काढलेल्या  परिपत्रकाप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल !
 एम.डी.ओ संघटने दि.11/ 02/19 रोजी दिलेले निवेदना बाबत वरील संबंधित कार्यालयात आपल्या स्तरावर पत्रव्यवहार करण्यात यावा अशी मागणी संघटनेने केली सहाय्यक कामगार आयुक्त नादेड़ एम.ए.सय्यद.यांनी सांगितले  सदर निवेदनाची छायाचित्र प्रत वरिष्ठ संबंधित कार्यालयाला योग्य त्या कारवाई साठी पाठवण्यात  येईल;प्रलंबित अवजारे व खरेदी योजनेचे अर्ज निकाली  काढतेवेळस कामगारांची नोंदणी जिवंत असणे आवश्यक आहे याबाबत वरील कार्यालयास मार्गदर्शन मागवावे याबाबत वरील कार्यालयास मार्गदर्शन मागविण्यात येईल असे कामगार अधिकाऱ्यांनी सांगितले या सर्व बाबांचे लेखी पत्र मिळाल्यानंतरच एम.डी.ओ  संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन  मागे घेण्यात आले जर आचारसंहिता नंतर दिलेल्या निवेदना वरील प्रश्न मार्गी काढले नाही तर पुढे या कार्यालयाच्या विरोधात पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला यावेळी  साहाय्यक कामगार आयुक्त मा. एम.ए.सय्यद व सरकारी कामगार अधिकारी मा. अ.अ.देशमुख ,शेख अनवर ,पठाण, एम.डी.ओ संघटनेचे महेबूब खान पठाण जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर,शेख उस्मान शेख इस्माईल या बेमुदत धरणे आंदोलनला राजकीय पक्ष,सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता  यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें