शिक्षक ते ज्येष्ठ विधिज्ञ नगराध्यक्ष सेलू भूषण असा प्रवास थांबला.
सेलू प्रतिनिधी
सेलू येथील प्रसिद्ध व जेष्ठ विधिज्ञ ॲड वसंतराव सखारामपंत खारकर यांचे बुधवार दिनांक 20 मार्च 2019 रोजी सकाळी 11:45 च्या दरम्यान राहत्या घरी दुःखद निधन झाले मृत्युसमयी ते 86 वर्षांचे होते
गेल्या काही दिवसापासून वसंतराव खारकर उर्फ मामा हे वार्धक्यामुळे अंथरुणावर पडून होते मात्र या परिस्थितीतही ते ज्या संस्थांचे पदाधिकारी होते त्या त्या संस्थेविषयी सतत चौकशी करत असत
वसंतराव पारकर मामा हे दोन वेळा सेलू नगर परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते तसेच थेट जनतेतून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते सर्वप्रथम नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते वसंतराव खारकर मामा यांचा जन्म 9 ऑगस्ट 1933 रोजी झाला होता सेलू येथील नूतन शिक्षण संस्थेची स्थापना झाल्यानंतर नूतन विद्यालयात त्यांनी ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव यांच्यासोबत शिक्षक म्हणूनही काम केले होते व तसेच बीए एलएलबी केल्यानंतर त्यांनी सेलू येथे वकिली व्यवसाय सुरू केला होता त्यानंतर त्यांनी 1967 झाली सर्वप्रथम सेलू नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी करून निवडून आले यावेळी ते उपाध्यक्ष म्हणून निवडून आले 1978 मध्ये ते जनतेतून सरळ निवडणुकीद्वारे अध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा त्यांचा मान आहे त्यानंतर 1985 मध्ये ते परत एक वेळ नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले याशिवाय शहरातील नूतन विद्यालय शिक्षण संस्था केशवराज बाबासाहेब विद्यालय संस्था यासह सह अनेक सामाजिक व संस्कृतिक संस्थांवरही ते पदाधिकारी म्हणून कार्यरत होते नूतन शिक्षण संस्थेचे सदस्य उपाध्यक्ष यासह केशवराज बाबासाहेब विद्यालय संस्था चे ते चिटणीस होते तसेच सेलू येथील एकमेव ग्रंथालय स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय या संस्थेचे उपाध्यक्ष व चिटणीस म्हणूनही ते कार्यरत होते त्यानंतर या संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते याशिवाय बाल संस्कार प्रतिष्ठान भांगडियाजी रुग्ण सेवा मंडळ रोटरी क्लब या संस्थेवरही ही पदाधिकारी म्हणून कार्यरत होते
1992 मध्ये सेलू येथे झालेल्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे ते यजमान होते तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटी आदर्श नगर गृहनिर्माण संस्थेचे ते स्थापनेपासून अध्यक्ष होते याशिवाय त्यांनी आदर्श दूध डेअरी चे अध्यक्षपदही ही भूषविलेले आहे
अशाप्रकारे विविध साहित्यिक संस्कृतिक शैक्षणिक संस्थेतून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला दिसून येतो याशिवाय नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी यशस्वी कारकीर्द केलेली असून त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन इसवी सन 2007 मध्ये त्यांना सेलू भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते त्यांनी शेवटपर्यंत कुठल्याही गोष्टीत तडजोड न करता काही तत्व अंगीकारले होते नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द केलेल्या वसंतराव खारकर मामा यांनी नगरपरिषदेच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची वकिली ची केस घेतली नाही अशा या भिष्माचार्य म्हणून परिचित असलेल्या वसंतराव खारकर मामा यांचे दुःखद निधन झाले असून यांचे निधन सर्वांच्या जीवाला चटका लावून जाणारे ठरले आहे त्यांच्या पश्चात प्रसिद्ध उद्योजक महेश खारकर व अडवोकेट उमेश खारकर ही दोन मुले विवाहित दोन मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दिनांक 21 मार्च 2019 रोजी आदर्श नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून सकाळी 7:30 च्या दरम्यान निघणार असून अंत्यविधी तहसील जवळील स्मशानभूमीत होणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें