झीजतानाही दरवळणारा देव्हार्यातल चंदन स्त्री, सवर्थाने या जगाला मिळालेल वरदान स्त्री"=शेख समीना अ.रौफ - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 6 मार्च 2019

झीजतानाही दरवळणारा देव्हार्यातल चंदन स्त्री, सवर्थाने या जगाला मिळालेल वरदान स्त्री"=शेख समीना अ.रौफ

महिला दिन विशेष.


तोडून पिंजरा,माहित नाही?
कधी उडून जाईल मी,
येउद्या संकटे हजारो लाखो
तरी ही आकाशात
जागा बनवेल मी,
हो,गर्व आहे मला
स्त्री आहे मी,
 पारंपारिक वादगरस्तानि साखळीने बांधले
पाय माझे,
तरी ही याला तोडून
जाईल मी,
जे परीस्थितीला हार मानतिल
अशी नाही मि,
हो,गर्व् आहे मला
स्त्री आहे मी।।।
स्त्री ही अदिशक्तीच् रूप आहे...होती..आणि राहांनारच.त्यात वाढच होत आहे.देवाने स्त्रियांना सहशीलतेचे सुंदर वरदान दिलेय ... त्यामुळे आयुष्यात कितीही कसोटीचे दुःखाचे प्रसंग आले तरी  चटकन सावरनारी,खंबीरपने उभी राहनारि स्त्रीच असते.
     ज्या प्रमाणे मधमाशी प्रत्येक पानाफुलातून थोड़ा थोडा मध जमा करते तसेच प्रत्येक महिला आपल्या इवल्याश्या कल्पकतेतून जे जे उत्तम उत्तुंग ते ते टिप्न्याचा सुंदर प्रयत्न करत असते.सौदर्याचे छोटे चिमुकले क्षण कण गोळा करत ती स्वतः बरोबर इतरांचे ही जीवन समृद्ध करत असते आनन्दी करत असते .
    आजच्या युगात तर स्त्रीने घरा बरोबरच सर्व क्षेत्रा मधे आपला स्थान बनवला आहे.परंतु 21 व्या शतकामधे सुद्धा स्त्रीया विषयी भेदभाव पूर्ण जगामधे पसरलेला आहे.काही वर्षापुर्वी म्हणजे दोन पिढ्या मागे पर्यन्त स्त्री ही फक्त स्त्री होती तिला आपल्या कुटुंबातलया आणि समजातल्या स्थानचि जाणीव  असायची चुल अणि मूल यातच तीच जगन होत. घरातील तीच दुय्यम स्थान मुळतच तीच अस्तित्वच दुय्यम मानल जायच  तरीही विट नाही ,कंटाळा नाही ,त्रास नाही..इतका उत्साह इतकी सहनशीलता कोठेही नाही..स्त्री जगावेगळी.. स्वतः उपाशी राहुन सनावारि सुद्धा
शीळ पाके खाऊन ,जुने पाने वस्त्र घरिदारी घालून आपल्या मुलांना मात्र गोडधोळ पूरवत अवघड अश्या संसारचा शकट मोठ्या कौशल्याने हाकणार्या या पूर्वीच्या स्त्रीया ....
    मान्य आहे, शिक्षणाच्या ज्ञानगंगेने या पपरिस्थित बदल घडत गेला आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियाचे अस्तित्व लक्षणीय ठरत आहे समाजात स्त्रियांची वेगवेगळी रूप आपलयाला पाहायला मिळतात कोणतेही क्षेत्र असो महिलाचे योगदान हे असते अनेक क्षेत्रामधे महिला उल्लेखनीय कामगिरी करत आहे,आपन अशा महिलांचा उल्लेख करायला गेलोतर कितीतरी नावे समोर येतात.1)राजमाता जिजाऊ2)क्रांति ज्योति सावित्री बाई फुले3)कल्पना चावला4)किरण बेदी5)इंदिरा गांधी6)सिंधुताई सपकाळ ई.तरी पण आज महिलावर अत्याचार होताना दिसत आहेत,महिलांच्या सुरक्षितेसाठी व् हक्कासाठी अनेक कायदे व् योजना सरकार मार्फत योजल्या आहे 1)हुंडा प्रतिबन्धकारक कायदा 2)महिला संरक्षण कायदा ई,
आज आपण स्त्री पुरुष समान आहेत म्हणतो ,पण खरच आहेत का समान?समानतेची वागणूक मिळते का आज महिलांना?
काय वाटत तुम्हाला झालाय का काही बदल?नक्कीच नाही महिला दिनाच्या दिवशी याचा प्रत्येकाने विचार करावा व प्रत्येकाने आपला दृष्टिकोण बदलण्याची गरज आहे..शेवटी एवढंच म्हणेल
जन्मा येण्याच कारण "स्त्री,नात्यामधील गुंफन स्त्री,
 दुःखाला लिम्पन स्त्री,
मायेच शिंपन स्त्री,
झीजतानाही दरवळणारा देव्हार्यातल चंदन स्त्री,
सवर्थाने या जगाला मिळालेल वरदान स्त्री"

       शेख समीना अ.रौफ मुख्याध्यापिका,डॉ.टी.जी.लोंढे इंग्लिश स्कूल,वालुर.जि.परभणी.

1 टिप्पणी: