दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले भोकरदन पोलिसांची कारवाई - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 6 मार्च 2019

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले भोकरदन पोलिसांची कारवाई

 एक मोटारसायकलसह ३८३०० रुपये जप्त.


भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन मध्ये अवैधरीतीने दारू पुरवठा करणाऱ्या टोळीला  भोकरदन पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी दारू वाहतूक करतांना पकडले.त्यांच्याकडून ३८३०० रुपये व एक मोटरसायकल जप्त करण्यात आली असून तीन जणांना अटक करण्यात आले आहे.(१)दत्तू विनायकराव दळवी रा.मनापूर(२)भानुदास प्रभाकर तळेकर रा.भोकरदन(३)शंकर शेनफळ तळेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.ही कारवाई मा.पोलीस अधीक्षक जालना, अप्पर पोलीस अधीक्षक जालना व भोकरदनचे उपविभागीय अधिकारी सुनिल जय भाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंदन इमले व स्टाफचे सपोनि.सोने,पोउपनि साखळे, एएसआय कोनार्डे, रुस्तुम जैवाळ, जगन्नाथ जाधव, संजय क्षीरसागर,गणेश निकम,समाधान जगताप,विजय जाधव, होमगार्ड शेरखान,गोरखनाथ नामदे,संदीप गिरी यांनी केली. अवैध दारू पुरवठा करणाऱ्यांचे आता धाबे दणाणले आहे.यापुढे अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध अशीच कारवाही करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें