एम.डी.ओ संघटनेची जिल्हाधिकारी कड़े मागणी.
प्रतिनिधी.परभणी.दि.05/03/2019.परभणी:सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून मागील तीन वर्षापासून विविध कल्याणकारी योजने अंतर्गत अनुदान वाटप होत नसल्याने दि . ०८ / ०३ / २०१९ रोजी संघनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या कड़े मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने देण्यात आले या निवेदनात असे नमुद करण्यात आले की परभणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून बांधकाम कामगारांना विविध योजनेअंतर्गत अनुदान प्रलंबित आहे त्यांना लोकसभेच्या २०१९ निवडणुक आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता असतांन असुन आचारसंहिता लागू होण्यापुरवी प्रलंबित असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचे अनुदानात तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे व कार्यालयातील अधिकारी - कर्मचा - यांकडून वेळकाढू धोरण , दप्तर दिरंगाई , विविध अर्थसहाय्य कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी गेल्या तीन वर्षापासून होत नसल्याने संघटनेकडून लोकशाही मार्गाने आंदोलने , निदर्शने उभारण्यात आली होती . इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या हिताच्या अर्थसहाय्य अनुदान कामगारांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन *मायनॉरेटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेला* दिले होते . परंतु बांधकाम कामगारांचे विविध योजनेअंतर्गत अनुदानाच्या हजारो फाईल प्रलंबित आहेत . सबंधित अधिका-याकडून लाभार्थ्यांची दिशाभूल करून त्यांची अनेक वर्षापासून विविध कल्याणकारी योजनेच्या अनुदानात विलंब होत असल्यामुळे तसेच निधीची *उपलब्धता* असूनही या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी व हलगर्जीपणाच मुळे या वंचित कामगारांना नाहक त्रास सोसावा लागत आहे . | सदरील सर्व बाबी लक्षात घेता संबंधीत अधिकार्यांची सखोल चौकशी करून त्यांची जबाबदारी निश्चित करून या प्रकरणी दोषी असलेल्या सबंधित अधिकारी कठोर कारवाई करून 2019 निवडणूकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी *विविध कल्याणकारी योजनेचे अर्थसहाय्य अनुदान इमारत व बांधकाम कामगाराचे खात्यात पैसे ( अनुदान ) जमा करण्यात यावे .* अन्यथा कामगारांच्या न्याय हक्कासाठी *मायनॉरेटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने दि . ०८ / ०३ / २०१९ रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलन* सुरू करण्यात येईल . यातून उदभवणा-या सर्व परिस्थितीतची जबाबदारी सबंधित *अधिकाऱ्यांवर* राहिल असे निवेदन जिल्हाधिकारी यदेण्यात आले या निवेदनावर महाराष्ट्र सचिव महेबूब खान पठाण, जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर उपाध्यक्ष शेख उस्मान शेख इस्माईल तालुका अध्यक्ष शेख गणी शेख रहेमान यदिचे साक्षरी आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें