शासकीय कामात अडथळा भाजप कार्यक्रत्यांवर गुन्हा दाखल . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 मार्च 2019

शासकीय कामात अडथळा भाजप कार्यक्रत्यांवर गुन्हा दाखल .

सोनपेठ-मंजूर मूल्ला                            
सोनपेठ तालुक्यात वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वसुली करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास  भाजपाचे  कार्यक्रर्ते सुशिल आप्पा रेवडकर यांचा विरोधात शासकीय कामात अडथळा व धक्काबुकी करत शिवीगाळ केल्याची फिर्याद विज वितरण कर्मचारी ज्ञानेश्वर ढमें यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात दिली त्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.                            .                                                                  
वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वीज वितरण कंपनीने तालुक्यात वसुली सुरू केली आहे. गावातील वीज वसुलीसाठी संपूर्ण रोहित्र बंद करून संपुर्ण गावास वेठीस धरण्याचा प्रकार का करत आहे या कारणांमुळे  ता. १२ रोजी अशाच प्रकारच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील सायखेडा येथील रोहित्र बंद केल्यामुळे गावातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने रोहित्र सुरू करून देण्याच्या प्रकारामुळे भाजप कार्यक्रर्ते सुशील रेवडकर यांची व वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्या सोबत वाद झाला. त्यामुळे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी ज्ञानेश्वर ढमे यांनी सुशील रेवडकर यांनी शासकीय कामात अडथळा व धक्काबुकी करत शिवीगाळ केल्याची फिर्याद सोनपेठ पोलीस ठाण्यात दिली त्यावरून सुशिल रेवाडकर यांच्यावर 353,323,504,506 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असुन पुढील तपास सपोनि. शेख उस्मान यांच्या मार्गदर्शनात ब.न.286 अनिल शिंदे हे करीत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें