गर्भवती महिलेवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 मार्च 2019

गर्भवती महिलेवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा.

पवनपुत्र सेवाभावी संस्थेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन.


प्रतिनिधी-
केदारखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दीड महिन्याच्या गर्भवती महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.जवखेडा ठोबंरे येथील सरला ज्ञानेश्वर नांगरे ही महिला केदारखेडा येथे 22 जानेवारी रोजी झालेल्या कुटुंब कल्याण शिबिरात तपासणीसाठी आली होती. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी एक दिवस अगोदर पूर्ण तपासण्या करण्यात आल्या होत्या.यानंतर दुसऱ्या दिवशी सदरील महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु संबंधीत महिला दीड महिन्याची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रियेपूर्वी तपासण्या केल्या होत्या त्यांनीच सदरील महिलेला गर्भवती असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर लटपटे व बेजबाबदार कर्मचाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी पवनपुत्र सेवाभावी संस्थेच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. विस्तार अधिकारी पी आर मोरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष अनिल भुतेकर,सचिव संदिप भोकरे,संभाजी ब्रिगेड तालुका सचिव विवेक जाधव,छत्रपती सेनेचे विकास जाधव,तालुका अध्यक्ष भूषण जाधव,सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे,संदिप गांवडे,श्रावण वाघ,विष्णू बरडे, दत्ता बरडे,किशोर पाडळे, भानुदास रजाळे,हनुमंता जाधव आदींच्या सह्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें