नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम काल (रविवार) जाहीर झाला. निवडणुकीच्या दरम्यान मुस्लिमांचा सण रमजान येतोय. यावरून राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. स्वत:च्या फायद्यासाठी मुस्लिम समुदाय आणि रमजानचा वापर का करता, असा सवाल करीत रमजान दरम्यान जरी निवडणुका असल्या तरी मुस्लिम मतदानावर त्याचा काही परिणाम होणार नाही असे म्हणत ‘एमआयएम’चे प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी रमजानवरून राजकारण करणाऱ्यांवर टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ११ एप्रिल रोजी सुरू होत आहे. याच दरम्यान रमजान महिना देखील आहे. निवडणुकीवर तृणमूल काँग्रेस नेता आणि कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी भाजपावर निशाणा साधला. अल्पसंख्यांकानी मतदान करावे असे भाजपला वाटत नाही. म्हणून रमजान असल्याची काळजी घेतली नाही. पण आम्हाला काळजी नाही. आम्ही मतदान करणार असेही ते म्हणाले.
यावर ओवैसी यांनी टीका केली आहे. मुस्लिम समाजातील लोक रमजानच्या महिन्यात रोजा नक्की पाळतील. ते या वेळी सामान्य आयुष्यच जगत असतात. कामावर जातात. गरीबातील गरीब व्यक्ती देखील रोजा ठेवते, किंबहुना रमजानमध्ये मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसेल, असे ओवेसी यांनी म्हटले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें