शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव.
शिर्डीतील आदर्श शाळेतील इयत्ता नववीत शिकणारे तीन मुलं अचानक बेपत्ता झाल्याने शहरात पालकांनमध्ये खळबळ उडाली होती.
तब्बल ४८ तासानंतर तीनही मुलांचा शोध लागला. आणि त्यांना पालक आणि पोलिसांनी वाघोली येथुन ताब्यात घेतले आहे.साई भारत बावीस्कर, संकेत राजेंद्र वीर, सोनु नवनाथ कुल्थे अशी या मुलांची नावे आहेत.
गुरूवारी ही तीनही मुले शाळेत जाण्यासाठी निघाली,मात्र शाळेत गेलीच नाहीत.तर आपल्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने घराबाहेर पडुन बक्कळ पैसा कमावू व आई-वडिलांना देऊ असा विचार करत हे तिघेही घराबाहेर गेले. त्यांच्याकडे जेमतेम १५० रूपये होते.वाघोली पर्यंत सगळे पैसे संपले आणि घरची आई-वडिलांची आठवण येऊ लागली.दोन रात्र बाहेर काढल्यानंतर मात्र या तिघांना घरची माया समजली आणि शनिवारी यातील एकाने आपल्या घरी फोन करून आपण वाघोली येथे असल्याचे सांगितले.
आपण घरी आई-वडिलांच्या पदराखाली किती सुखरुप व सुरक्षित आहोत याची कल्पना त्यांना घर सोडल्यावर आली.बाहेरील जगात आपला निभाव लागण्याचे कठीण असे सांगत कोणीही आमच्या सारखे घर सोडु नका असे यावेळी या मुलांनी सांगितले.
आपण पैसे कमावण्यासाठी घराबाहेर पडु आणि पैसे कमवू हे स्वप्न त्यांनी पाहीले.मात्र हे स्वप्न साकार करण्यासाठी आई-वडिलांची खंबीर साथ महत्त्वाची असते.वाघोली येथुन एका मुलाने घरी फोन केला आणि त्यानंतर पोलिस पथक आणि पालक त्यांना घरी घेवुन आले. शनिवारी रात्री या तिघांना ताबा पावती करुन पालकांच्या ताब्यात दिले.असे पोलिस निरीक्षक राणा परदेशी यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें