बालपण निरागस ,तरुणपण जबाबदार व म्हातारपण प्रगल्भ हवे - श्री.अभिजित धर्माधिकारी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 2 मार्च 2019

बालपण निरागस ,तरुणपण जबाबदार व म्हातारपण प्रगल्भ हवे - श्री.अभिजित धर्माधिकारी.

विवेकानंद विद्यालयात शिक्षक -शिक्षण शिबीर.

सेलू प्रतिनिधी
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयात विद्यासभेअंतर्गत स्थानिक शिक्षक- शिक्षण शिबीर दि.२३ फेब्रुवारी व २४ फेब्रुवारी रोजी पार पडले. शिबिरात एकुण ८ सत्र घेण्यात आली.उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात धर्माधिकारी बोलत होते.ते पुढे म्हणाले की ,आजच्या युगात समंजसपणाची परीक्षा होते परंतु बहुश्रुततेची परीक्षा होणे गरजेचे आहे.शिक्षक हा समाजपरिवर्तन करणारा घटक आहे.
उदघाटन , कुलधर्म- कुलाचार ,यशाने दुमदुमवू त्रिभुवने ,शिकवु आनंदे ,मी तंत्रस्नेही ,सादरीकरण ,कार्यकुशलता व व्यक्तिमत्त्व विकास, समारोप या आठ सत्रात शिबीर पार पडले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणुन नूतन संस्थेचे  अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया ,डॉ.स्नेहलताई पाठक , अभय मंडलिक,सुधीर चौधरी, हरिभाऊ चौधरी ,किरण डूघरेकर ,गौतमराव सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. शिक्षक-शिक्षण शिबिराचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रा.गजानन होना व श्री .अंबादास रोकडे उपस्थित होते.
सूत्रसंचालन विजय चौधरी, प्रास्ताविक विनोद मंडलिक ,शिबीर संकल्पना अंबादास रोकडे ,आभार मु.अ. बळवंत देशमुख यांनी मानले.
कुलधर्म-कुलाचार या सत्रात डॉ.स्नेहलताई पाठक यांनी मार्गदर्शन केले. शिकवु आनंदे सत्रात बजरंग गिल्डा , मी तंत्रस्नेही सत्र योगेश ढवारे , शिशुवाटिका पंचकोश विकसन सत्र विरेश कडगे ,सादरीकरण सत्रात १३ शिक्षकांनी विविध विषयांवर भाषणे सादर केली.कार्यकुशलता व व्यक्तिमत्त्व विकास सत्रात हभप श्री योगेश महाराज साळेगावकर यांनी मार्गदर्शन केले.
समारोप सत्रात मा.श्री .डॉ.विनायकराव कोठेकर , सौ.सुनीताताई देशपांडे यांची उपस्थिती होती.
डॉ.कोठेकर म्हणाले की, अधिकार प्राप्तीशिवाय एखादी गोष्ट सांगणे व्यर्थ आहे,कार्याचा भार झाल्यावर कामाचा आनंद नष्ट होतो .
'व्हावे जीवन यज्ञसमर्पण 'हे शिबीर गीत सौ पूजा महाजन यांनी सादर केले.
समारोप सत्राचे सूत्रसंचालन किरण नाईक व आभार सौ रुपाली सोनसळे यांनी मानले. शिबीर यशस्वी होण्यासाठी विवेकानंद विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बालवाडी ताई ,सेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें