सेलू प्रतिनिधी.
सेलू तालुक्यातील जि. प. शाळा केमापूर येथे दि. 1 मार्च रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णू आंधळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रामराव बोबडे, रामराव गायकवाड, वसंत बोराडे हे उपस्थित होते. यावेळी गावच्या सरपंच सौ. उषाताई गुठ्ठेे,गुजाबाई पवार, रामप्रसाद आंधळे, व्यंकट तोरनाळे, माधव गव्हाणे हे उपस्थित होते.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थांनी सादर केलेल्या हिंदी-मराठी गीतांवर गावकऱ्यांनीही ठेका धरला.तर 'मले बाजाराला जायचं नाही' या विनोदी नाटिकेतून पर्यावरण व सामाजिक संदेश दिला व गावकऱ्यांना विचार करायला भाग पाडले. आदिती रोकडेच्या 'फॉरेनची पाटलीन'या एकपात्री प्रयोगाने गावकरी खळखळून हसले.
कार्यक्रम चालू असतानांच हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानहून सुटका झाल्याचे समजताच त्यांना सर्व गावकऱ्यांनी उभे राहून टाळ्या वाजून त्यांचे अभिनंदन केले. आणि लगेच शाळेतील विद्यार्थ्यांनी जलवा जलवा हे देशभक्ती गीत सादर केले आणि सारे गावकरी देशभक्तीच्या वातावरणात शहारून गेले.गावातील पोलिस कैलास राठोड यांचा व शाळेला पुस्तकांची भेट देणारे मनोहर आंधळे यांचा शाळा व्यवस्थापन समितीने सत्कार केला.
यावेळी अस्मिता रोकडे हिनेही एकपात्री प्रयोग केला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद ठाकर यांनी केले, सूत्रसंचालन ज्ञानेश्वर इघारे तर आभार प्रदर्शन दगडोबा माघाडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रणिता गाडे,दिगंबर रोकडे,गजानन गुठ्ठे यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें