न प कर्मचारी असतानाही राजकीय व्यासपीठावर हजेरी.शेख आयुब शेख अमिनुद्दिन यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 1 फ़रवरी 2019

न प कर्मचारी असतानाही राजकीय व्यासपीठावर हजेरी.शेख आयुब शेख अमिनुद्दिन यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची मागणी.



सेलू प्रतिनिधी.समशेर खान.

स्वतः नगरपरिषदेत कर्मचारी असतानाही नगरसेवक म्हणून वावरत असल्यामुळे तसेच मी नगरसेवक बोलतोय या आशयाची मुलाखत दूरदर्शन वर दिल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली आहे
 याबाबतचे वृत्त असे की सेलू येथील नगर परिषदेत आस्थापना लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या शेख आयुब शेख अमिनुद्दिन या कर्मचाऱ्याने आपण स्वतः एक कर्मचारी असल्याचे विसरून आपण एक नगरसेवकच आहोत या आवेशात एका दूरदर्शन वाहिनी ला मुलाखत देऊन खळबळ उडवून दिली आहे त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे दिलीप डासाळकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे
शेख आयुब अमिनुद्दिन हे गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषदेतील आपल्या पत्नीने केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी व्हाट्सएप फेसबूक आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करत असून आपण स्वतः एक नगरसेवक अथवा नगराध्यक्ष असल्याचा अविर्भाव अनंत विविध विकास कामे करत असल्याच्या आविर्भावात प्रसिद्धीमाध्यमांना मुलाखत देणे आदी गोष्टी मोठ्या प्रमाणात करत आहेत सेलू नगरपरिषदेत त्यांची पत्नी प्रभाग क्रमांक 4 मधून नगरसेविका आहेत मात्र पत्नीला बाजूला सारून आपणच स्वतः नगरसेवक असल्याचा आव आणतात तसेच यापूर्वीही अनेक राजकीय व्यासपीठावर जाऊन विविध नेत्यांना सत्कार करणे आदी गोष्टी बिनधास्तपणे करतात मात्र या गोष्टी करतेवेळी ते स्वतः कर्मचारी असल्याचे विसरून आपण स्वतः नगरसेवक आहोत आपण आजवर कुठल्या कुठल्या प्रभागात विकासकामे केली आहेत याबाबतची मुलाखत शेख आयुब यांनी नुकतीच 30 जानेवारी 2019 रोजी जे एम  आर   टीव्ही न्यूज चैनल ला दिलेली आहे तसेच तसेच या व्रताची क्लीप त्यांनी आपण स्वतः याबाबतची क्लिप व्हाट्सअप वरून प्रसारित केलेली आहे मी नगरसेवक बोलतोय या सदरात त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले असून ही कृती कर्मचारी वर्गाच्या विरोधात आहे तसेच कर्मचारी असतानाही राजकीय नेत्यांशी संबंध ठेवणे व्यासपीठावर जाणे त्यांचा सत्कार करणे आदी विविध गोष्टी करत असल्यामुळे ते सतत चर्चेत असतात मात्र या गोष्टींकडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अथवा संबंधित अधिकारी हे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांनी दिलेल्या या मुलाखतीमुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी दिलीप डासाळकर यांनी केलेली असून जिल्हाधिकारी तथा संबंधित प्रशासन शेख आयुब यांच्यावर कुठलीही कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शेख आयुब हे जुलै 2019 मध्ये निवृत्त होणार असून त्यानंतर येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या विरोधात आपण निवडणूक लढवणार आहोत असे त्यांनी यापूर्वी अनेक वेळा ठामपणे सांगितले आहे मात्र निवृत्तीनंतर आपण काय करणार आहोत ते करावे मात्र कर्मचारी असताना निवृत्तीच्या पूर्वीच त्यांना राजकीय डोहाळे लागलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर कुठली कार्यवाही होती हे येत्या काळेल  याबाबतची कार्यवाही शेख आयुब यांच्यावर झाली तर आणि तरच कर्मचारीवर्गावर वचक राहील आणि शासकीय नियमां बद्दल आदर राहील आणि कुठलाही कर्मचारी यापुढे राजकीय व्यक्तींशी संबंध ठेवणे अथवा राजकीय व्यासपीठावर जाणे टाळेल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें