विवेकानंद विद्यालयात स्वा. सावरकरांचा आत्मार्पण दिन साजरा . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 26 फ़रवरी 2019

विवेकानंद विद्यालयात स्वा. सावरकरांचा आत्मार्पण दिन साजरा .


सेलू / प्रतिनिधी
येथील विवेकानंद विद्यालयात स्वा. वि. दा. सावरकर यांना  आत्मार्पण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रारंभी स्वा. सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विध्यार्थ्यांनी जयोस्तुते हे प्रेरणादायी गीत सादर केले.
विद्यालयातील शिक्षक विजय चौधरी व विनोद मंडलिक यांनी सावरकरांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली.
विजय चौधरी म्हणाले की , स्वा. सावरकर हे महान देशभक्त, जहाल क्रांतिकारक, झुंजार स्वातंत्र्यसेनानी ,धैर्याचे मेरूमणी, प्रतिभासंपन्न कवी ,सिद्धहस्त लेखक ,विज्ञानवादी ,तत्त्वनिष्ठ ,सहस्रावधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे वक्ते होते.
विनोद मंडलिक यांनी स्वा.सावरकरांची भाषाशुद्धी ,लिपीशुद्धी ,प्रतिभावंत साहित्यीक या पैलूंवर प्रकाश टाकला. मु.अ. बळवंत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर राऊत ,दीपाली भावसार , चेतन नाईक ,सतीश भुजबळ ,श्रीपाद जोशी ,संध्या शोभने यांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें