सोनपेठ व्हिजन पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 4 फ़रवरी 2019

सोनपेठ व्हिजन पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरा.

  सोनपेठ मंजूर मूल्ला/ सोनपेठ येथील व्हिजन पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन 3 फेब्रुवारी रोजी अतिउत्साहात पार पडले.                               .                                                      .                                                    
 शहरातील व्हिजन पब्लिक  स्कुल येथे स्नेहसंमेनल साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्धाटन सिनेअभिनेत्री ज्योती जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. राजेश दादा विटेकर(मा.जि.प.अध्यक्ष,परभणी) सौ.जिजाबाई राठोड(नगराध्यक्षा सोनपेठ)डॉक्टर सुभाष पवार(तालुका वैद्यकीय अधिकारी सोनपेठ) डॉक्टर दामोधर पवार(दंत चिकित्सक,गंगाखेड)मा.रामेश्वर चव्हाण(उद्योजक) मा. विनोद पवार,शाळेचे प्राचार्य डॉ. दुकळे सर व प्रा. श्रवण कुमार सर, प्रा. शायनी मॅडम(विश्वभारती प्रायमरी स्कूल, सोनपेठ) इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान शाळेतील गुनवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ज्योती जोशी यांनी मुलांना व पालकांना योग्य ते मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी गुजराती,पंजाबी, महाराष्ट्रीयन अशा विविध संस्कृतीचे दर्शन घडविले. नृत्य,गीते सादर केली. तसेच देशभक्ती गीतांचे ही विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.शिवजी महाराज,जिजामाता, व मावळे यांनी प्रेक्षकाचे आकर्षण केले. "बेटी बचाव बेटी पढाओ" अशा सामाजिक प्रश्नांवर नाट्य नाटकांमधून जनजागृती करण्यात आली.व्हिजन चे प्रा.डॉ दुकळे सर यांनी वार्षीक अहवाल सादर  केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भगवान घाटूळ सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रल्हाद निर्मळ सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी प्रयत्न केले.यावेळी पालक बहुसंखेने उपस्तिथ होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें