पाथरी ता.पञकार संघाच्या अध्यक्ष पदी गणेश जत्ती तर उपाध्यक्षपदी शेख सिकंदर यांची बिनविरोध निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 7 फ़रवरी 2019

पाथरी ता.पञकार संघाच्या अध्यक्ष पदी गणेश जत्ती तर उपाध्यक्षपदी शेख सिकंदर यांची बिनविरोध निवड.

पाथरी / प्रतिनिधी.
पाथरी शहरातील शासकिय विश्रामगृह येथे दि.६ जानेवारी मंगळवार  रोजी  मा. रा. म.पत्रकार संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष  मिर्झा अब्दुल्ला बेग   यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील पञकारांची बैठक ठेवण्यात आली होती.
या बैठकीत  जेष्ट पञकार गणेश जत्ती यांची तालुकाध्यक्ष म्हणुन तर पञकार शेख सिकंदर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी पुढील कार्यकरणी निवडण्यात आली.या मध्ये  पञकार राजकुमार कांबळे याची कोषाध्यक्ष तर संघटक अहेमद अन्सारी व सहसचिव अ.हाफीज बागवान तर मुख्यसल्लागार म्हणुन पञकार मिर्झा अब्दुल्ला बेग उर्फ पाशा बेग यांची तर सल्लागार पदी पत्रकार सप्निल ब्रम्हराक्षे यांची निवड करण्यात आली आहे.तर सदस्य म्हणुन पञकार शेख अझर,शेख नदीम आदींची निवड करण्यात आली आहे.
पाथरी शहरात नव वर्षाच्या निमित्ताने निवडण्यात आलेल्या पञकार संघटनेची माहीती झाल्यावर दि.५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता  नुतन पदाधिकाऱ्यांचा  सत्कार पाथरी न.प.चे.गटनेते तथा युवा नेते जुनेद खाॅन दुर्राणी यांच्या हस्ते ता. अध्यक्ष गणेश जत्ती व उपाध्यक्ष शेख सिकंदर यांच्या सह   सर्व कार्यकरणीतील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
तसेच    भारीप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी च्या  वतिने शासकिय विश्रामगृह येथे पञकार संघाचे नवनिर्वार्चित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी भारीप बहुजन महासंघ चे तालुका अध्यक्ष अॅड. आशोक पोटभरे, पाथरी शहराध्यक्ष मुजीब आलम, भारिप चे माजी जिल्हा युवा अध्यक्ष सिध्दांत भाग्यवंत, सामाजिक कार्यकर्तै शेख गणीभाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राध्यापक वसंत पोटभरे,युवा नेते अविनाश प्रधान, सोमनाथ विद्यार्थी आंदोलनाचे तालुका उपाध्यक्ष ऋषीकेश भाग्यवंत, भीमराव गोटे, सिद्धार्थ पौळ,आदी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें