स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत सोने तस्करीतील रुपये 1 लाख 70 हजार जप्त. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 9 फ़रवरी 2019

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत सोने तस्करीतील रुपये 1 लाख 70 हजार जप्त.

मात्र दोन लाखांचे सोने नसून सोन्याचे घबाड सापडले असल्याची चर्चा .


सेलू प्रतिनिधी

नाशिक येथून संशयितरित्या सेलू येथे सोने आणून विकणाऱ्या इसमाकडून सोने विक्री केलेल्या रक्कमेपैकी रुपये 1 लाख 70 हजार ची रोकड संशयित इसमाकडून जप्त केली असून न्यायालयाने संबंधित आरोपी चार दिवसाची पोलिस कोठडी दिली असून याबाबत सेलू पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील गायत्री नगर भागात राहणारा गौतम इंगळे नाशिक येथे कामाच्या शोधार्थ गेला होता त्याने सेलू येथे येऊन एका छोट्या मुलाच्या हस्ते रुपये दोन लाखांचे सोने सातोना येथील सोन्याचा व्यापारी विठ्ठल बहिवाल  तसेच सेलू येथील सोन्याचा कारागीर खूडे यांना सोन्याचे बिस्किट विक्री करून दोन लाख रुपये पैकी तीस हजार खर्च केले उर्वरित रुपये 1 लाख 70 हजार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांना याबाबतची कुणकुण लागताच त्यांनी सेलू येथे येऊन सापळा रचून आरोपी गौतम इंगळे त्याच्याकडून ये दोन लाखांचे सोने विक्री करून आलेले रकमेपैकी रुपये 1 लाख 70 हजार जप्त करून त्याने सोने विक्री केले त्या सातोना येथील विठ्ठल बहिवाल व  सेलू येथील  खुडे यांना त्या दोघांनाही विक्री केले त्या  दोघांनाही ताब्यात घेऊन संबंधिताकडून किती सोने घेतले व चोरीचे होते की काय याबाबतची चौकशी करण्या करता त्यांना ताब्यात घेतले   असता    सदरील सोने चोरीचे होते की काय याबाबतचा तपास करण्याकरिता सेलू न्यायालयासमोर उभे केले असता आरोपीला सेलू न्यायालयाने  चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली
मात्र याबाबत सेलू अणि परिसरात वेगळीच चर्चा ऐकण्यात येत असून संबंधित आरोपी हा नाशिक येथून सोन्याचे बिस्किट सेलू येथे आणून विक्री करतो या पाठीमागचे गौडबंगाल काय आहे याबाबत उलटसुलट चर्चा ऐकण्यात येते संबंधित आरोपीला पोलिसाने विचारले असता मला एका ठिकाणी सोन्याचे बिस्किट सापडले असे सांगत होता विक्री करतो ते सोने असे होते की अन्य कुठल्या गोष्टीतून सापडले होते याबाबत संशय कायम असून याबाबत पोलिसांना सुगावा मिळतो मात्र सापडलेले सोने हे केवळ दोन लाखाची नसून फार मोठे घबाड असल्याची चर्चा ऐकण्यात येते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें