शिवसेना आणि यांच्यात अखेर युती झाली. दोन्ही पक्षांनी तलवारी म्यान करत गळ्यात गळे घालत आगामी लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढण्याची घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली. गेले ५ वर्ष दोन्ही पक्षांनी एकमेकांना वाक्यबाणांनी घायाळ केले होते. शिवसेना आणि यांच्यात अखेर युती झाली. दोन्ही पक्षांनी तलवारी म्यान करत गळ्यात गळे घालत आगामी लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढण्याची घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली. गेले ५ वर्ष दोन्ही पक्षांनी एकमेकांना वाक्यबाणांनी घायाळ केले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्याच भाषेत सांगायचे झाले तर आता २०१९ आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभेसाठी शिवसेनेने कमळाबाईचा हात यातात घेतला आहे. लोकसभेसाठी शिवसेना २३ जागांवर लढेल तर भाजप २५ जगांवर लढेल. तर विधानसभेसाठी ५०-५० ( १४४-१४४ ) फॉर्म्युला ठरला आहे. पत्रकार परिषदेत मुख्यमत्र्यांनी काही मुद्यांवर दोघांमध्ये मतभेद झाले. पण, दोघांमधील हिंदूत्वाचा समान दुवा असल्याने एकत्र आलो. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना आग्रही होती. त्यामुळे भाजपने पीकविम्याची प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच नाणार प्रकल्पाची जागा बदलण्याची घोषणा केली. या प्रकल्पाला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वांनी कंबर कसली आहे. युतीवरुन शिवसेना आणि भाजप पक्षात असणारा वाद सर्वांच्या परिचयाचा आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपात युतीवरुन असणारे मतभेद दूर झाल्याचे समजते. यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सोमवारी (ता.१८) शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील एका हॉटेलमध्ये भाजप नेत्यांची बैठक सुरु होती. ती आटपून अमित शहा मातोश्रीवर दाखल झाले आहेत. शहांबरोबर मुख्यमंत्री फडणवीस, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, प्रकाश जावेडकर, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवार असे भाजपचे जम्बो पथक मातोश्रीवर दाखल झाले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने १८ तर भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. तर विधानसभेत शिवसेना ६३ आणि भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. शिवसेना - भाजप युतीचा लोकसभेसाठीचा फॉर्म्युला शिवसेना २३ आणि भाजप २५ असा असण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. तर विधानसभेत ५०-५० चा फॉर्म्युला असण्याची शक्यता आहे. यात भाजप शिवसेना प्रत्येकी १४४ जागांवर लढण्याची शक्यता आहे. युती बाबत दोन्ही पक्षांची जवळपास सहमती झाली असली तरी मुंबई उत्तर-पूर्वचे खासदार किरीट सोमय्या यांना तिकीट देण्यास शिवसेनेच्या खासदारांनी विरोध केला आहे. त्यामुळे याबाबत काय निर्णय होतो याबाबत उत्सुकता आहे. तर युतीतून बाहेर पडलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींची हातकणंगलेची जागा कोणच्या वाट्याला जाते हेही पहावे लागेल. नुकतेच राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचा पुत्र धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी आपला जनसंपर्क वाढवण्यास जोरदार सुरुवातही केली आहे. शिवसेना - भाजप यांच्यात युती होत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्थानिक पातळीवर शिवसेनेबरोबर राज्यात केलेल्या सर्व आघाड्या तातडीने तोडण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेने राज्यात आणि केंद्रात सत्तेत असतानाही भाजपवर विरोधी पक्षांपेक्षा विखारी टीका करत होती. तर भाजपनेही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेवर टीका करताना खालची पातळी गाठली होती. कही दिवसांपूर्वी एकमेकांच्या उखाळ्या पाकळ्या काढणारे हे दोन पक्ष आता एकत्र येत प्रचार करणार आहेत. यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात पडण्याची शक्यता आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें