सेलू प्रतिनिधी
सेलू :- येथील श्रीराम प्रतिष्ठान येथे शिवजयंती निमित्य “छत्रपती आणि आजचा मावळा” या विषयावर आधारित व्याख्यानाचा कार्यक्रम (ता.1८) वार सोमवार रोजी विद्याविहार शैक्षणिक संकुल येथे पार पडला.
यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, मुख्य वक्ते तथा शिवव्याख्याते मा.धनंजय कंटूले, प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष रामराव गायकवाड, मराठा सेवा संघाचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष रामराव बोबडे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, राजेश घनसावंत तसेच घटक संस्थेचे सर्व प्राचार्य उपस्थित होते.
काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादीच्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या CRPF च्या जवानांना श्रद्धांजली उपस्ठीताच्या वतीने देऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यानंतर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब, स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रिन्स अकॅडमीच्या समृद्धी गायकवाड, समृद्धी काकडे , वैदश्री चट्टे यांनी “शिवबा माझा बसलाय घोड्या वरी” या शोर्य गीताने उपस्ठीताची मने जिकली.
शिवश्री धनंजय कंटूले आपले विचार मांडत असताना म्हणाले की, माणूस हा खूप साधा प्राणी आहे. स्वतः मध्ये बदल करणे खूप गरजेचे आहे. पण आम्ही भारतीय बदल करायला तयार नाहीत. कुठलीही व्यक्ती जी बनते तीचा मुख्य केंद्रबिंदू हा शाळा असते. म्हणूनच आपण जेथे आहोत त्या ठिकाणी सर्वोच्य ठिकाणी कसे जाता येईल या साठी प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे. ती दुरदृष्टी आजच्या शिक्षण पद्धतीत आहे. म्हणूनच जीवन जगात असताना आपण आपल ध्येय व स्वप्न उराशी बाळगले पाहिजे. याचाच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझा शिवाजी राजा. अस काय होत शिवाजी महाराज या नावाचे रसायन. की आजही आपण त्याच नाव घेतो. स्वधर्माचा इतिहास रचणारे, या मराठी मातीत सोन्याचा नगर फिरवणारे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण का साजरी करतोत, शिवाजी महाराज समजले का?, असे अनेक प्रश्न पडतात. याचा उलगडा त्यांनी आपल्या व्याखानातून दिला. शिवरायंची शिकवण, नेतृत्व कौशल्य, एकसंघ पणा, अठरा पगडजातीचा विचार, निर्णय क्षमता व समयसूचकता कशी असली पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज या विषयी रामराव गायकवाड, रामराव बोबडे, कु.तनिष्का तेलभरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय ठाकर तर आभार रवींद्र रोडगे यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें