सेलूचा आशिष पवार राज्य पुरस्काराने सन्मानित.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 15 फ़रवरी 2019

सेलूचा आशिष पवार राज्य पुरस्काराने सन्मानित..



सेलू प्रतिनिधी

सेलू :- कला व हस्त व्यवसाय (वस्त्रकला) क्षेत्रात गुणवत्ता मिळविल्या बद्दल सेलू येथील आशिष मधुकर पवार यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य कला संचनालयाच्या वतीने नाशिक येथे 59 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कला संचालक राजीव मिश्रा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आशिष पवार याने या प्रदर्शनात स्वतःच्या मेहनतीने तयार केलेल्या हातमाग मशीनद्वारे विविध वस्त्रकला तयार करून प्रदर्शनात मांडल्या होत्या. परिक्षकांनी त्यांच्या वस्त्रकलेला विशेष गुणवत्ता प्रदान केल्यामुळे कला संचलनालयाच्या वतीने आशिष पवार यांना राज्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वस्त्रकला क्षेत्रात राज्य पुरस्कार प्राप्त झालेला सेलू शहरातील पहिलाच मानकरी ठरला आहे. त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें