बदनापुर येथील शिवानी गँस एजन्सीचे भोंगडा कारभारामुळे शहर सह तालुक्यातील जनता व्यतागले . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 15 फ़रवरी 2019

बदनापुर येथील शिवानी गँस एजन्सीचे भोंगडा कारभारामुळे शहर सह तालुक्यातील जनता व्यतागले .

उपसंपादक. शेख अजहर
गॅस एजन्सी वाल्यांचा मनमानी कारभार घरगुती सिलिंडरच्या काळ्याबाजारात चढ्या दराने विक्री:-

वेळेवर गॅस सिलिंडर न मिळणे, कर्मचा-यांना अड्डेलतट्टपणा आणि ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे
...................

भारत पेट्रोलियमच्या घरगुती सिलिंडरचा शहरात गेल्या महिनाभरापासून तुटवडा आहे. काळ्या बाजारात सिलिंडर मिळतो, पण अधिकृत नोंदणी करून मिळत नसल्याने ही कृत्रिम टंचाई असल्याचा आरोप काही नागरिक करीत आहेत.
ऑनलाइन बुकिंगनंतरही बदनापूर शहरात सिलिंडरचा अपुरा पुरवठा होत आहे.
         त्यामुळे पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, सिलिंडरसाठी पंधरा दिवसांपासून महिनाभरापर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.
वितरक घरगुती सिलिंडर काळ्याबाजारात विक्री होत आहे अशी चर्चा सुद्धा जनतेतून होत आहे त्यामुळे बुकिंगनंतर आठ दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी नागरिकांकडून केल्या जातआहे .
गेल्या पाच दिवसांपूर्वी ऑनलाइन बुक करूनही अद्याप सिलिंडर मिळालेला नाही. वितरकांकडे चौकशी केली असता कंपनीकडूनच गाड्या येत नसल्याची कारणे देवुन उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. काळ्या बाजारात सिलिंडर अर्ध्या तासात मिळत आहे. परंतु, अधिकृत नोंदणी करूनही सिलिंडर मिळत नाही, त्यामुळे सिलिंडरचा जाणीवपूर्वक तुटवडा केला जात आहे,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें