आपत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपत्तीपूर्व नियोजन महत्वाचे- जीवराज डापकर.
सोनपेठ (मंजूर मूल्ला) दिनांक १२फेब्रुवारी २०१९
परभणी जिल्हा आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जनजागृती मोहिमेत शहरातील श्री महालिंगेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात आज दि.१२फेब्रुवारी २०१९ रोजी जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्यावतीने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांचे आदेशानुसार तालुका स्तरावर शालेय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य धोके व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत, जन जागृती कार्यक्रम व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक जोशी पी.एल. हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर, तहसीलदार जीवराज डापकर यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, डॉ. गजानन खळीकर, विजय बोरसे, हरिश गोरे आणि पत्रकार गणेश पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना तहसीलदार जीवराज डापकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपत्तीचे प्रकार व त्यामुळे होणाऱ्या परिणामांची सविस्तर माहिती दिली. तसेच आलेल्या आपत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपत्तीपूर्व नियोजन महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. जिल्हा अपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. प्रथोमपचार पद्धती संबंधित माहिती डॉ.गजानन खळीकर यांनी दिली, तर आग विझवण्याबाबत प्रात्यक्षिकासह सखोल माहिती आग्नीशामक यंत्राची हाताळणी व बचावकार्य तज्ज्ञ इंजिनिअर विजय बोरसे यांनी स्पष्ट केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सक्षशिक श्रीकांत परळकर यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाती शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनिंची उपस्थिती मोठ्याप्रमाणात होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें