उपसंपादक शेख अजहर.
जालना येथे दिनांक १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय इज्तेमा संपन्न झाला यात दोन दिवसीय इज्तेमाला हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.
दोन दिवसाच्या या कार्यक्रमासाठी मोठी तयारी करण्यात आली होती प्रत्येक तालुक्यातील गावा गावातून आणि शहरातून शेकडो युवक २ दिवस इज्तेमासाठी आले होते . या इज्तेमासाठी येणार्या मुस्लिम समाज बांधवांसाठी मोठा.
मंडप उभारण्यात आला होता वजुखाना स्वच्छतागृह तयार करण्यात आले होते . तसेच पाण्याची कमतरता भासू नये याचे नियोजनही करण्यात आले होते पार्किंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली जालना जिल्ह्याच्या कानाकोप - यातून मुस्लिम समाज बांधव इज्तेमासाठी सहभागी होणार असल्याचे चारही बाजूंनी येणा - या वाहनांसाठी दुचाकीसाठी स्वतंत्र पार्किंग करण्यात आली आहे . दोन दिवसांमध्ये मुस्लिम समाजाचे धर्मगुरु यांचे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले .
.......................................
स्वच्छतेवर विशेष लक्ष
सर्व स्वंयसेवकांकडून इज्तेमामध्ये स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष देतांना दिसले या भागात वेळोवेळी कचरा साफ करून हा परिसर स्वच्छ ठेवण्यात येत होता . होणारा कचरा साफ करून नगरपालिकाच्या घंटागाडीतून या कच - याची विल्हेवाट लावण्यात येत होती .
"" "" "" "" "" "" "" "" "" "" "" "" ""
ठिकठिकाणी स्वंयसेवकांची नेमणूक
या इज्तेमासाठी भाविकांना अडचणी येवू नये व वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रत्येक रस्त्यावर ठिकठिकाणी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आली असून पार्किंगसाठी पाणी , लाईट , पेन्डॉल व्यवस्था सांभाळण्यासाठी अशा विविध कामांसाठी स्वंयसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें