सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील हतनूर येथील महावितरणच्या तारा अत्यंत जीर्ण झाल्या असून या तारा खांबावरून लोंबकळत आहेत या तारा तुटून अनर्थ होण्याची भीती निर्माण झाली असून ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे या तारा दुरुस्त करण्याची मागणी अभियंत्यांना एका निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे सेलू तालुक्यातील हतनूर येथील खांबावरील तारा मागील अनेक दिवसापासून जीर्ण झाल्या आहेत याबाबत महावितरण प्रशासनाला लेखी व तोंडी निवेदन देऊनही याकडे महावितरण प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे सोमवार 11 फेब्रुवारी पर्यंत या तारा दुरुस्तीचे काम झाले नाही तर काही जीवितहानी झाल्यास यांची संपूर्ण जबाबदारी महावितरणवर राहील आणि ग्रामस्थ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनावर सरपंच सौ मिना शेळके जयसिंग शेळके बाळू नरवडे विजय नरवडे नाथा खवणे संदीप नागटिळे एकनाथ काकडे अक्षय दिग्रसकर रामचंद्र पारवे बाबा शेळके शिवाजी राऊत सुभाष गाडे बाबुराव निर्वळ महेंद्र गाडे भगवान खंदारे संजय सहजराव सुंदर डुकरे भागवत राऊत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें