सेलू प्रतिनिधी
सेलू (ता.24) :- राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शासनाने आरटीई 25 टक्के अंतर्गत जे प्रवेश दिलेले आहेत त्यांचा फि परतावा तातडीने देण्यात यावा. यासह अनेक मागण्यासाठी सोमवारी (ता.25) रोजी राज्यव्यापी शाळा बंदचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती इंडीपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे (ईसा) कार्यकारिणी सदस्य तथा प्रिस्कुल व अकॅडमीक प्रमुख डाॅ संजय रोडगे यांनी दिली.
राज्यव्यापी शाळा बंद हा राज्य शासनाकडून विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी हा बंद पाळण्यात येत आहे. 1 नोव्हेंबर 2018 रोजी एका आदेशाद्वारे जाचक अटी लादलेला शासन निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा. 18 नोव्हेंबर 2013 च्या शासन आदेशात दुरूस्ती करावी. राज्यात सुरक्षा कायदा आणावा. 2012 ते 2019 पर्यंत आरटीई 25 टक्के प्रवेशाचे कोट्यावधी रुपये शासनाकडे थकीत आहेत ते तात्काळ शाळेंना फी परतावा देण्यात यावा. विद्यार्थी वाहतूक संदर्भात मुख्याध्यापकाऐवजी शाळेने नियुक्त केलेल्या वाहतूक व्यवस्थापकावर जबाबदारी सोपविण्यात यावी. स्वयं अर्थसहायित तत्वावर दर्जा वाढ प्रस्तावासाठी ऑनलाईन प्रक्रिया तातडीने सुरू करावी. यासह ईतर मागण्यासाठी ईसा संघटनेच्या वतीने सोमवारी शाळा बंदचे अंदोलन करण्यात येणार आहे. या अंदोलनात राज्यातील सर्वच शाळा सहभागी होणार असल्याची माहिती इंडीपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे (ईसा) राज्य कार्यकारिणी सदस्य तथा प्रिस्कुल व अकॅडमीक प्रमुख डाॅ संजय रोडगे यांनी दिली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें