मुख्याधिकार्‍यांनी आश्वासन देऊन एक महिना झाला तरी अद्यापही स्मशानभूमीची दुरवस्था. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 24 फ़रवरी 2019

मुख्याधिकार्‍यांनी आश्वासन देऊन एक महिना झाला तरी अद्यापही स्मशानभूमीची दुरवस्था.


सेलू प्रतिनिधी

सेलू येथील सारंगी गल्ली भागातील मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून मागील महिन्यात उपोषणास बसलेल्या उपोषण कर्त्यांना मुख्याधिकारी नगरपरिषद सेलू यांनी पंधरा दिवसात सदरील स्मशानभूमीची संरक्षण भिंत बांधून त्याची दुरुस्ती करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणास बसलेल्या  नागरिकांनी उपोषण मागे घेतले होते मात्र या घटनेस जवळपास एक महिना पूर्ण होत आला आहे तरीही अद्यापही सदरील स्मशान भुमीकडे कुणीही ढुंकूनही पाहिलेले नाही उलट तहसील परिसरात असलेल्या स्मशान भूमी रोडवर आकर्षक विद्युत रोषणाई करून स्मशान भूमी अत्यंत आधुनिक पद्धतीने बांधून त्याचे उद्घाटन मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले यामुळे सेलू आणि परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे

याबाबतचे वृत्त असे की येथील सारंगी गल्ली भागातील स्मशान भुमी पोलिस कॉटर रोड लागत असून या स्मशानभूमी चा उपयोग परिसरातील अनेक भागातील मुस्लिम नागरिक करतात या स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झाली असून गेल्या अनेक वर्षापासून या स्मशानभूमीत कुठल्याच प्रकारची सुविधा नसल्यामुळे अंत्यविधीला जमलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो याचे गांभीर्य लक्षात घेऊन सेलू येथील काही मुस्लिम तरुणांनी याबाबत नगरपरिषद यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती तसेच 26 जानेवारी रोजी येथील नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते त्यावेळी सेलू नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले की येत्या पंधरा दिवसात जिल्हाधिकारी यांच्याकडे यासंदर्भात मंजुरी घेऊन या स्मशानभूमीचे संरक्षण भिंतीचे बांधकाम करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील या घटनेस आज जवळपास एक महिना होत आला आहे मात्र तरीही मुख्याधिकारी काय परंतु नगरपरिषदेच्या कुठल्याही सदस्याने देखील ढुंकूनही पाहिलेले नाही विशेष बाब म्हणजे या प्रभागातून दोन मुस्लिम नगरसेवक निवडून आलेले आहेत मात्र त्यांनीही या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केलेले आहे एकीकडे या स्मशानभूमीची दुरवस्था झालेली असताना व नगरपरिषदेने याकडे लक्ष देणे गरजेचे असताना येथील तहसील कार्यालयाजवळ स्मशान भूमी मात्र अत्यंत आधुनिक पद्धतीने बांधून देण्यात आली असून या स्मशान भूमी वर बहुदा पहिल्यांदाच कुठेही अशाप्रकारे सजवण्यात आली नाही मात्र या स्मशान भूमी वर लाइटिंग करून महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते या स्मशानभूमीचे उद्घाटन करण्यात आले ही बाब अतिशय शरमेची असून मुस्लिम समाजाच्या स्मशान भुमीकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे सेलू तील मुस्लिम नागरिक याबाबत नाराजी व्यक्त करत असून लवकरच मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे काही मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्त्याने बोलून दाखवले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें