उपस्थित असलेल्या पुरूष व महिलांनी घेतला गहन शांतीचा अनुभव.
सोनपेठ (मंजूर मूल्ला ) सोनपेठ येथील तहसिल कार्यलयात राष्ट्रीय आयुष अभियान महाराष्ट्र आणि ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभागामार्फत मानसिक स्वास्थ्य आणि राजयोग ध्यानाभ्यास कार्यशाळेचे अयोजन करण्यात आले. . .या कार्यक्रमात उपस्थितांनी मेडिटेशनद्वारे गहनशांतीचा अनुभव करुन दैनंदिन जीवनातील धावपळीपासून तणावमुक्तिचा अनुभव घेतला.
. . राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत मेडिटेशन वर्कशॉप फॉर हेल्थ केअर प्रोव्हायडर्स या उपक्रमातर्गत शासकीय अधिकारी व कर्मचायांसाठी मानसिक स्वास्थ्य व राजयोग मेडिटेशन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आरोग्य अधिकारी व कर्मचायांचे मानसिक बळ वाढविणे हे प्रमुख उद्देश होता.त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यात ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभाग, महाराष्ट्र यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन केले गेले. त्याचच एक भाग म्हणून सोनपेठ स्थानिक ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्र आणि सोनपेठ शासकीय वैद्यकिय विभागामार्फत सदरहू कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आरोग्य मार्गदर्शनात डाँ.पवार म्हणाले की आपण देत असलेल्या सेवेत अधिक निपुणता येते आणि अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा जनतेस दिली जाऊ शकते या उद्देशाने आरोग्य सेवेत असणा-याच आपल्या अधिकारी आणि कर्मचायांना शारीरिक स्वास्थ्या बरोबर मानसिक स्वास्थ्याचे प्रशिक्षण मिळावे आणि मानसिक स्वास्थ्याचे त्यांनी प्रबोधन करावे या उद्देशाने आरोग्य कार्यशाळेचे प्रशिक्षण घेतले जात आहे.
यावेळी सोनपेठ तहसिलदार जिवराज डापकर,तालुका वैद्यकिय अधिकारी डाँ.पवार,बि.के. मिरा दीदी भगवान राठोड, प्रदिप गायकवाड सर, कर्मचारी, ग्रामीण तसेच रूग्णालयातील ईतर कर्मचारी उपस्थित होत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें