सेलू येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत धाडसी दरोडा.20 लाखांची रोकड लंपास. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 2 फ़रवरी 2019

सेलू येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत धाडसी दरोडा.20 लाखांची रोकड लंपास.

सेलू प्रतिनिधी.

सेलू येथील सेलू पाथरी रोड वरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत  दिनांक 2 फेब्रुवारी रोजी पहाटे पहाटे चारच्या दरम्यान दरोडा पडला असून वीस लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की येथील  सेलू पाथरी रोड वरील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर  यांच्या घरासमोरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत 2 फेब्रुवारी शनिवार रोजी पहाटे 4 च्या   दरम्यान चोरट्यांनी चॅनेल गेटचे कुलूप तोडून बॅंकेत प्रवेश केला तसेच बँकेची तिजोरी आडवी करून त्यातील रोख रुपये 19 लाख 80000 ,174 रुपयाची चोरी केली त्यात तिजोरीत असलेले केवळ नोटांचे बंडल घेऊन चोरटे पसार झाले मात्र तिजोरीत असलेले तेवीस हजार रुपयाचे नाणे न नेता तसेच ठेवून चोरटे पसार झाले याप्रसंगी बँकेतील कपाट उघडून त्यातील कागदपत्रे फेकून दिली मात्र या सर्व घटनेमुळे मुख्य रस्त्यावरील या बँकेच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे जिल्हा बँकेची सदरील शाखा ही मुख्य रस्त्यावर असून या बँकेत शेतकरी तसेच अन्य खातेदार यांची सतत ये-जा असते मात्र बँकेच्या सुरक्षाव्यवस्थेकडे बँकेने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून येते की एकूण पाच चोरट्यांनी बँकेत येऊन दरोडा टाकल्याची दिसत आहे चोरट्यांनी तोंडाला काळे कपडे बांधून बॅंकेत प्रवेश केला 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान बँकेचे व्यवस्थापक। भागवत काळे यांनी बँक बंद करून निघून गेले मात्र शनिवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी भागवती बॅंकेत येतात त्यांना चॅनल गेटचे कुलूप तुटलेले दिसले व बँकेत जाऊन पाहतात तो सर्व कपाटातील कागदपत्रे इतस्ततः फेकून दिलेली होती व तिजोरी आडवी करून त्यातील वीस लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले होते हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी बँकेच्या मुख्य शाखेत कल्पना देऊन सेलू पोलिसांना याबाबत कळवले त्यानंतर परभणी येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्वास पानसरे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे सेलू येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रेणुका वागळे पोलीस निरीक्षक संदिपान शेळके इत्यादींनी घटनास्थळी धाव घेऊन स्थळ पाहणी केली तसेच श्वानपथकाला ही बोलावण्यात आले होते मात्र यातूनही चोरट्यांचा थांगपत्ता लागू शकला नाही त्यामुळे अज्ञात चोरट्यांच्या  विरोधात सेलू पोलिसात शाखा व्यवस्थापक भागवत काळे यांच्या तक्रारीवरून भागवत यांच्या तक्रारीवरून भादवि कलम 457 व 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांच्याकडे आहे
रोख रकमे शीवाय बँकेतील इंटरनेट चे मोडेम व इतर असे एकूण 7 हजार 500 रुपयांचे साहित्यही चोरट्यांनी पळवून नेले एकूणच जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या या चोरीमुळे सेलू तील पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान उभे ठाकले असून चोरटे पोलिसांपेक्षा ही हुशारीने चोऱ्या करण्यात पटाईत आहेत हेच सिद्ध होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें