जन, जडाचा जिवांच्या उध्दारासाठीच संतांचे अवतार : नामदेव महाराज ढवळे सेलूतील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 11 फ़रवरी 2019

जन, जडाचा जिवांच्या उध्दारासाठीच संतांचे अवतार : नामदेव महाराज ढवळे सेलूतील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.



सेलू प्रतिनिधी

सेलू ,दि. ११ : संत सर्वांचे मायबाप आहेत.कृपावंत आहेत. जन, जडाचा जिवांचा उध्दार करण्यासाठी ते भूतलावर अवतीर्ण झाले. जन, जड, जिवाचा उध्दार करणे.त्यांना भक्ती मार्गाला लावणे, नामस्मरणात लीन करणे, हाच त्यांचा मुख्य हेतू आहे, असे प्रतिपादन संत विष्णूदास नामदेव महाराज ढवळे यांनी दि.१० फेब्रुवारी रोजी काल्याच्या कीर्तन प्रसंगी केले.
तीन फेब्रुवारीपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जन्मोत्सवानिमित येथील पाथरी रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसरात आयोजित अखंड हरिनामसप्ताहाचे हे अकरावे वर्ष होते.दररोज सकाळी व सायंकाळी कीर्तन सेवा, अल्पोपहार व सायंकाळी महाप्रसाद. गाथा भजन व दुपारी सुनील महाराज आष्टीकर यांनी संगीतमय महाभारत कथा निरूपण केले.
काल्याच्या कीर्तन सेवेसाठी ढवळे महाराजांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा
" तुम्ही संत माय बाप कृपावंत
काय मी पतीत कीर्ती वाढू
अवतार तुम्हा धरायला कारणू
उध्दरया जन,जग जड जीवा "
हा अभंग घेतला होता.
ते म्हणाले, जीवांचे वाढदिवस थाटामाटात होतात.देवांचे मात्र जन्मोत्सव हर्षोल्ल्सात होतात.
संत आहेत म्हणून आपण देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहतो. वारी करतो. अभंगाचे निरूपण करतांना ढवळे महाराजांनी विविध सिध्दांत व प्रमाण दिले. गोकुळातील श्रीकृष्णाच्या लिलांचे महात्म्य सांगितले. यावेळी महाप्रसादाचे अन्नदाते जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने, संत ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत लिहणारे दत्तराव बोराडे यांचा सत्कार करण्यात आला. दहीहंडी फोडून काल्याचा व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली. सेलू शहर व तालुक्यातील भाविकांनी सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें