पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा भोकरदन नगरपरिषद वर मोर्चा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 12 फ़रवरी 2019

पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा भोकरदन नगरपरिषद वर मोर्चा.

महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.


शेख सलीम.

भोकरदन प्रतिनिधी:
शहरात पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू झाली असून, महिला पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. महिलांनी पिण्याचे पाणीसाठी भोकरदन नगरपरिषद कार्यालवर मोर्चा काढला.
भोकरदन शहरातील काझी मोहल्ला, सतार गल्ली,आदि भागातील नागरिकांना व विशेष करून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू झाली असून, महिला पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील मरकज मस्जिद परिसर ,काझी मोहल्ला, सुतार गल्ली आदि भागातील महिलांनी पिण्याचे पाण्यासाठी नगरपरिषद कार्यालवर मोर्चा काढला.शहरात गेल्या दीड दोन महिन्यांपासून शहरात पिण्याचे पाण्याची जास्त टंचाई भागात असून संतप्त महिलांनी अल्पसंख्याक काँग्रेसचे ता.अध्यक्ष मोहंमद शाहरुख यांच्यासह  नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढला.शहरात पिण्याच्या पाण्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली असून, या महिलांना पाणीसाठी वणवण भटकण्याची वेळ आली असून,अनेक भागात हातपंप ना दुरुस्त असून त्यालाही कमी पाणी येत आहे. प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारचा नियोजन केलेला दिसत नाही.यावेळी अल्पसंख्याक ता.अध्यक्ष मोहंमद शाहरुख, नगरसेवक रणवीर देशमुख,फसी बेग,फईम पठाण,शेख रईस,शमीम बेगम,रशिदा बी,सईदा बी,सलिम बेगम,सलमा बी आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें