प्रा.कांडेकर यांना राज्यस्तरीय शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार शिर्डी-प्रतिनिधी, राजेंद्र दुनबळे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 1 फ़रवरी 2019

प्रा.कांडेकर यांना राज्यस्तरीय शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार शिर्डी-प्रतिनिधी, राजेंद्र दुनबळे.


निरपेक्ष वृत्तीने समाजात काम करणारी काही माणसे असतात. कसलाही स्वार्थ मनात न ठेवता सामाजिक बांधिलकीचे त्यांना भान असते. आपले नियमित कार्य करता करता शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सेवेची छाप सोडणारे एक आदर्श व्यक्तिमत्व 'शैक्षणिक कार्य गौरव' पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.सुनिल पंढरीनाथ कांडेकर यांना 'ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था टाकळीभान' यांचे वतीने हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
     प्रा.कांडेकर एका सामान्य शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित व्यक्तिमत्व. घरची आर्थिक स्थिती बेताची असुनही आव्हानांना पेलत शिक्षणाचा वारू पैलतिरी नेला. अवांतर वाचन व जिद्दीचे बळावर श्री साईबाबा संस्थानात सेवेची सुवर्णसंधी लाभली. या संधीचे प्रा.कांडेकर यांनी खऱ्या अर्थाने सोने केले. बऱ्यापैकी पगार; मात्र पाय जमिणीवरच ठेवण्याची काळजी घेतली. भूतकाळाकडे नजर टाकत त्यांनी गरजू गरिब विद्यार्थ्यांना जमेल तेवढी शिक्षणासाठी मदत केली. आपण कुणाचेतरी देणे लागतो ही भावना व त्यातून घडणारे सत्कर्म बळ व समाजसेवेचा आनंद देत गेले. महाविद्यालयात वक्तृत्व,निबंध,कविता आदी प्रकारांत विद्यार्थ्यांत अभिरूची निर्माण केली. 'जे इतरांचे ते त्यांचेच व जे माझेजवळ तेही त्यांचेच' हा आदर्श ज्ञानभाव मनाशी जपत विद्यार्थ्यांना घडवत साईसंस्थानच्या लौकिकात भर घालण्याचे साईकार्य त्यांनी केले. मराठीचा गोडवा जपत हिंदी भाषेचीही गोडी मुलांत निर्माण केली. अनेक राज्यस्तरीय शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या पुरस्कारांचे प्रा.कांडेकर मानकरी ठरले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था (बार्टी) पुरस्कारही त्यांना मिळाला. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत  ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेने महाराष्ट्र राज्य निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब मोरे यांचे हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. विकास शिवगजे,मुख्याध्यापक गंगाधर वरघुडे,प्रा.दिलीप शेळके,प्रा.प्रशांत गडकरी,शिक्षककवी वसंत वाणी यांचेसह सर्व शिक्षक शिक्षकेतरांनी प्रा.कांडेकर यांचे अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें