जीवनमूल्ये जोपासण्यासाठी संस्कार कथांची गरज : प्राचार्या डॉ.कमलताई ठकार . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 9 जनवरी 2019

जीवनमूल्ये जोपासण्यासाठी संस्कार कथांची गरज : प्राचार्या डॉ.कमलताई ठकार .

शिक्षकांची विभागीय कथाकथन स्पर्धा हेलस कथामालेचा उपक्रम.


सेलू प्रतिनिधी.
सेलू, दि.09/01/2018. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेमुळे बालमनांवर संस्कार, जिवनाचे ध्येय, मूल्यांचे शिक्षण मिळते. कथा म्हणजे व्यथा, भाव-भावना तसेच संस्काराचे व्यासपीठ. जीवनमूल्ये जोपासण्यासाठी संस्कार कथा आवश्यक आहेत, असे प्रतिपादन प्रसिध्द व्याख्यात्या व विचारवंत प्राचार्या डॉ.कमलताई ठकार यांनी येथे केले.
मंगळवार दि.८ जानेवारी रोजी येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या  अॅड.वसंतराव खारकर सभागृहात अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा, हेलसच्यावतीने आयोजित शिक्षकांसाठीच्या मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धा व पारितोषिक वितरणप्रसंगी त्या  बोलत होत्या.
यावेळी अध्यक्षस्थानी श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गोविंदभाऊ जोशी, प्रमुख पाहुण्या म्हणून प्राचार्या डॉ.कमलताई ठकार, प्रसिद्ध पटकथाकार व गीतकार प्रा.चंद्रकांत शिंदे, ( मुंबई ) अ.भा.साने गुरुजी कथामालेचे कांतराव गाजरे, अॅड.एल.एम. सुभेदार, काशिनाथ ढोले, दुर्गादास कुलकर्णी यावेळी संयोजक कल्पना हेलसकर, डॉ सुहास सदाव्रते, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, सतीश कुलकर्णी, प्रमोद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. ठकार म्हणाल्या की, जगात आईच्या प्रेमाला तोड नसते. आईचे मन मोठे असते, म्हणतातना
" धन बाई गोत माळावर धुराडा
माई माऊलीचा पदर निराळा "
साने गुरुजी कथामालेतून विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक, भावनिक , शैक्षणिक व सामाजिक विकास होत आहे. जीवनला शिस्त लागतेय.
प्रा.चंद्रकांत शिंदे  म्हणाले, की साने गुरुजी कथामाला म्हणजे संस्काराचे विद्यापीठ. संस्काराचा धागा मनामनांत कथामाला रुजवत आहे. मराठवाड्यातील १४१ शिक्षकांनी यात सहभाग घेतला मराठवाडाभरच नव्हे तर महाराष्ट्रात संस्कारांच्या वारकर्‍यांचं जाळं उभे करणार्‍या ( कै ) दत्तात्रेय
हेलसकर आणि त्यांचा संस्कारांचा वारसा पुढे चालविणाऱ्या त्यांच्या पत्नी कल्पना व शिलेदारही कौतुकपात्र आहेत.
श्री.जोशी म्हणाले, साने गुरुजींनी कष्टकरी, कामगार, शेतकरी , विद्यार्थी, दीन दलितांविषयी सेवा भाव जपला. वैश्विकतेचा विचार मांडला. म्हणून साने गुरुजींच्या विचारांची पेरणी मनामनांत होणे गरजेचे आहे.

*विजेत्या स्पर्धकांत प्रथम : शिवदास रानबा पोटे ( जि.प.प्रा.शा.पिंपळगाव  कुटे, ता.वसमत जि.हिंगोली ), व्दितीय :   ज्ञानेश्वर गणपत झगरे (जि.प.प्रा.शा.घानखेडा, ता.जाफ्राबाद जि.जालना ), तृतीय : धाराशिव वैजनाथ शिराळे ( माधवराव वटेमोड विद्यालय, कौठा जि.नांदेड ) , उत्तजनार्थ : पठाण दस्तगीर वजीरसाहेब, गिरवली, ता.भूम जि.ऊस्मानाबाद यांचा समावेश आहे. रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते त्यांना गौरविण्यात आले.* यावेळी जेष्ठ पत्रकार नारायण पाटील यांना  राज्यशासनकडून अधिस्वीकृती पत्रकारांचा  दर्जा प्राप्त झाल्याबद्दल तसेच नितीन माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक संतोष ताल्डे यांनी साने गुरुजींची प्रतिमा रांगोळी तून सुबकरित्या साकारल्या बदल त्यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविकातून  जालना तथा परभणी जिल्ह्यातील कथामालेचे विविध बालसंस्कारदायी विविध उपक्रम व शाखा प्रसार आणि कथामाला स्थापना पुढाकाराची ग्वाही संयोजक कल्पना दत्तात्रेय हेलसकर यांनी दिली.
जालना जिल्हाध्यक्ष डॉ.सुहास सदाव्रते यांनीही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात कथामालेचे कार्य जोमाने वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले. परीक्षक म्हणून डॉ.गंगाधर गळगे, डॉ. यशवंत सोनुने, कथाकार शिरीष देशमुख, विद्यार्थी परीक्षक मनाली कुलकर्णी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन योगेश ढवारे, डॉ.सुहास सदाव्रते, तर आभार बाबासाहेब हेलसकर यांनी मानले.स्पर्धेच्या  यशस्वीतेसाठी  संयोजक कल्पना हेलसकर, डॉ सुहास सदाव्रते, बाबासाहेब हेलसकर, योगेश ढवारे, मुख्याध्यापक  सर्जॆराव लहाने, विजय वायाळ, सतीश कुलकर्णी, प्रमोद देशमुख, विलास शिंदे, मंताजी ढाकरे, दत्तात्रेय राऊतवाड  यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे, गिरीश लोडया, डॉ.आशीष मेहता, राम सोनवणे, मधुकर काष्टे, माजी उपनगराध्यक्ष कांचन कोरडे, सुनील गायकवाड, यशवंत चारठाणकर, बाबासाहेब चारठाणकर , मधुकर काष्टे यांच्यासह, शिक्षक, महिला व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें