मानवत येथे हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट, पाचदुकाने जळून खाक. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 28 जनवरी 2019

मानवत येथे हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट, पाचदुकाने जळून खाक.


शहरातील आठवडी बाजारातील चहाच्या हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट होऊन आजूबाजूची पाच दुकाने जळून खाक झाली आहेत. ही घटना (ता. २८ जानेवारी ) सोमवारी सकाळी साडेआठ ते पावणेनऊच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतेही  जीवितहानी अथवा कोणीही  गंभीर जखमी झाले नाहीत. आठवडी बाजारातील मुख्य रस्त्याच्या बाजूला सावळी येथील भास्कर काळे यांचे शिवशंकर हे चहाचे हॉटेल आहे. सकाळच्या वेळी हॉटेल मध्ये गॅसची टाकी बदलत असताना जास्त टाकीतील गॅस गळती होऊन आग लागून स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूची मंडळी दूर पाळली. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली परंतु तोपर्यंत पाच दुकाने जळाली होती. या घटनेत हॉटेल मालक भास्कर काळे हे जखमी झाले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें