दारूसह मटका गुटख्यावर बंदी घालण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 28 जनवरी 2019

दारूसह मटका गुटख्यावर बंदी घालण्याची मागणी.



सेलू प्रतिनिधी

सेलू शहरासह तालुक्यात दारू  व मटका गुटखा विक्रीला तसेच सर्व अवैद्य धंद्याला ऊत आला असून  या सर्वच अवैध धंद्यांना  अवर घालण्याकरीता त्यावर कायम बंदी आणावी अशी मागणी महिला मंडळाने केलेली आहे
संपूर्ण तालुक्यासह सेलु शहरात देखील बंदी असलेला गुटका मटका व दारू विक्री  यासह अवैध धंद्यांना ऊत आलेला असून येथील वालूर नाका जिंतूर नाका गायत्री नगर विद्यानगर या भागासह शहरातील अनेक भागात अवैध दारू विक्री फार मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच गुटखा विक्रीवर बंदी असताना देखील गुटख्याची देखील सर्रासपणे फार मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जात आहे त्यामुळे अगोदरच दुष्काळ आणि कमाईतून जो काही पैसा येईल तो सर्वच्या सर्व दारू व मटका यात घरचा कमावता माणूस घालत असल्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या घरच्या महिला यांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सदरच्या महिला मंडळांनी तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक यांना गावच्या सरपंचासह पोलीस पाटील व महिला मंडळाच्या वतीने निवेदन देऊन या अवैध धंद्यावर कायमची बंदी घालावी अशी मागणी होत आहे त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील राधे धामणगाव येथील महिला मंडळाच्या वतीने तालुका प्रशासनाला पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन त्यावर बंदी घालण्याची मागणी केलेली आहे त्यामुळे शहरातील व गावातील वातावरण खराब होत असून रात्रीच्या वेळी दारू डे मोठ्या प्रमाणात दारू पिऊन काचेच्या बाटल्या फेकून देतात त्यामुळे त्याचा धोका शालेय विद्यार्थ्यांना होऊ शकतो व त्यामुळे गावातील वातावरण दूषित होते तरी याबाबत संबंधितांनी तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें