बहुजन समाज पार्टीच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सिल्लोड समोर चार फेब्रुवारी पासून बेमुदत आमरण उपोषण: - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 30 जनवरी 2019

बहुजन समाज पार्टीच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सिल्लोड समोर चार फेब्रुवारी पासून बेमुदत आमरण उपोषण:

बँके त दलालांची चालती ,खरे कर्जदार कर्जा पासून वंचित.


प्रतिनिधी सिल्लोड दि. सरकारने सुशिक्षित बेरोजगार युवकांना सशक्त बनवण्यासाठी मुद्रा योजना जाहीर केली. योजनेअंतर्गत किशोर,शिशु,युवक या गटानुसार कर्जवाटप करण्यात येते .बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मुद्रा कर्जाचा लाभच मिळत नसल्याची स्थिती आहे.बॅंके खऱ्या कर्जदारांना कर्ज देत नाही व दलालांन मार्फत कर्ज वाटप करत आहे. व बँक शाखा अधिकाऱ्याच्या जातीवादी धोरणमुळे मी उपोषणचा मार्ग स्वीकारला.
मुद्रा कर्ज प्रकरणाची विचारणा करण्यास गेलो असता बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सिल्लोड चे व्ययस्थापक यांनी अरेरावी करून शिवीगाळ करून पोलीस केस करण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही होऊन दाखल केलेली मुद्रा कर्ज प्रकरणे मंजूर व्हावी या न्याय मागणी साठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सिल्लोड येथे दिनांक:०४/०२/२0१९ पासून कार्यकर्त्यांसह बेमुदत आमरण उपोषांनाबाबत वरील विषयी न्याय मिळण्यासाठी निवेदन देण्यात येते की, मी शेख अक्रम शेख अकबर बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हा प्रभारी असून सिल्लोड येथे राहतो.
         काही लोकांनी मुद्रा कर्ज घेण्यासाठी बँकेत कर्ज प्रकरणे दाखल केलेली आहेत. त्यांना मॅनेजर यांनी अनेक चकरा बँकेत मारायला लावून कर्ज प्रकरण कधी मंजूर करण्यात येईल या बाबत काहीच स्पष्ठ सांगितले नाही.इतरांची कर्ज प्रकरणे मात्र हे व्यवस्थापक मंजूर करत आहेत.
       त्या वेळेस मी, दिनांक२५/०१/२०१९ रोजी  दुपारी अंदाजे १:३० मी. कर्ज प्रकरणे श्री.कळसकर मी त्यांना कर्ज प्रकरण विषयी माहिती विचारली असता त्यांनी मला पहिल्या नंतर त्यांचा पारा वाढला त्यांना खुप राग आला त्यावेळेस त्यांनी मला सांगितले की , तुम्ही मुस्लिम, दलित,ओबीसी लोक फार थर्ड क्लासप्रवर्तीचे असतात. फक्त कर्ज घेण्याचे शोक करतात. तुम्ही नंबर एकचे दलाल असून नालायक लोक आहात.तुम्ही येथून लवकर जा नसता की, तुमच्यावर पोलीस केस करेल अशी धमकी दिली.तुम्हाला मी सरळ तुरुंगात पाठवून देईल असेही सांगितले. मी माझ्या मर्जीने कर्ज मंजूर करतो.
सदर मॅनेजर यांनी अनेक दलाल पाळली आहेत. त्यांच्यामार्फत ते त्यांच्या मर्जीतले काही खास लोकांचीच कर्ज प्रकरणे मंजूर करतात. मुद्रा योजनेचे कर्ज घेऊन आपला उद्योग व्यवसाय पाठविण्यासाठी अनेकजण प्रयत्नात आहेत पण, बँक ऑफ महाराष्ट्र चे,मॅनेजर अनेकांचा अपमान करून अरेरावी करून शिवीगाळ करून पोलिस केस करून  तुरुंगात पाठविण्याची भाषा करत आहेत. त्यांच्यावर अशा शाखा व्यवस्थापकामार्फत चौकशी होऊन निलंबनाची कार्यवाही करण्यात येऊन दाखल झालेली सर्व मुद्रा योजनांची व इतर योजनांची कर्ज मंजूर करण्यात यावी या न्याय मागणीसाठी मी व मुद्रा योजनेचे कर्ज प्रकरण दाखल   
केलेले असुन गरजू सह मी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सिल्लोड येथे दि.०४/०२/२०१९ पासून लोकशाही मार्गाने बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे.
तरी  या निवेदनाची गंभीर नोंद घेण्यात येऊन आम्हास न्याय देण्यात यावे ही नम्र विनंती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें