महाराष्ट्रातील मशिदीचे इमाम व मोजन यांना शासनातर्फे मानधन द्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 30 जनवरी 2019

महाराष्ट्रातील मशिदीचे इमाम व मोजन यांना शासनातर्फे मानधन द्या.

वंचित बहुजन आघाडीचे पाथरीच्या तहसिलदार यांना मागणीचे निवेदन सादर.
                              .

पाथरी/प्रतिनिधी
महाराष्ट्रातील  सर्व मशिदी च्या इमाम व मोजन यांना शासनातर्फे मानधन देण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने पाथरीच्या तहसिलदार भाग्यश्री देशमुख यांना निवेदना द्वरे करण्यात आली.                                                                           
 राज्यात मशिदी मधील ईमाम व मोजन यांची आर्थिक परस्थिती अत्यंत बिकट झालेली असुन या लोकांच्या कुटूबांच्या उदरनिर्वाह मशिदीत नमाज आदा करणाऱ्या लोकांन कडून दिलेल्या चंद्यातुन गोळा झालेल्या रक्कमेतुन कसाबसा चालतो या लोकांनी मागील सरकारला  मानधन देण्याचे मागणी केली असता त्यावेळेस काँग्रेस सरकारने फक्त आश्वासन दिले माञ मानधन दिले नाही त्यांचा मतापुरता वापर करून त्यांची फसवणूक करण्यात आल्यामुळे सध्याच्या  ससरकारने तरी महाराष्ट्रातील मशिदी मध्ये असणार्‍या सर्व इमाम व मोजन यांना शासनातर्फे मानधन देण्यात यावे अन्यथा  महाराष्ट्रातील सर्व मशिदी मधील इमाम व मौजनच्या मागण्यासाठी  लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतिने पाथरी तहसिलदार भाग्यश्नी देशमुख यांना निवेदना द्वारे करण्यात आली.निवेदनात बी.आर.एस,पी.जिल्हा महासचिव अहेमद एकबाल,एम.आय.एम.चे तालुका अध्यक्ष सय्यद युनूस हाशमी,स्वाभिमान संघटना पाथरी अध्यक्ष शेर खिन,अॅड.विलास मोरे,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मंचक हारकळ,शहर अध्यक्ष मुजीब आलम,भारीप बहुजन महासंघ तालुकाध्यक्ष अॅड.अशोक पोटभरे,सिध्दार्थ भाग्यवंत यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें