पुरस्काराने जबाबदारी वाढली:-सिद्धेश्वर गिरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 29 जनवरी 2019

पुरस्काराने जबाबदारी वाढली:-सिद्धेश्वर गिरी.

Add caption

सोनपेठ/प्रतिनिधी
प्रत्येक क्षेत्रात भरारी घेण्यासाठी पुरस्कार मिळत असतो.आणि मिळणारा पुरस्कार हा जबाबदारी वाढवत असतो आजच्या मिळालेल्या पुरस्काराने जबाबदारी वाढली असून यापुढे सामान्य लोकांना न्यायप्रक्रियेत सहभागी होण्यासाठीच कार्यरत राहणार असल्याचे मत पत्रकार सिद्धेश्वर गिरी यांनी बोलतांना व्यक्त केले.ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व अप्रतिम मिडिया फाउंडेशनच्या वतीने संयुक्तरित्या दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारात ग्रामीण वार्तांकन गटातून गिरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सोनपेठ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सामुहिक सत्कार कार्यक्रम ठेवला होता.याप्रसंगी गिरी बोलत होते.यावेळी त्यांनी पुढे बोलतांना आपल्याला पत्रकारितेच्या रोज एकाचा विरोध घेणारा पत्रकार असे संबोधल्या जाते.हा विरोध सत्यनिष्ट बाजूनेच खोडून काढल्या जाईल यासाठी काही संघटना पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी कार्यरत असतात.यात सर्व पत्रकारांनी एकत्र येत अशा संघटना आणि अवैध व्यवसाय करणाऱ्या काळ्याकारभाराविरुद्ध संघटन आणि एकीचे बळ करत त्यांचा दबाव झुडकारला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी जेष्ठ पत्रकार शिवमल्हार वाघे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,पत्रकारांनी सत्यता राखत वार्तांकन केल्यास त्या पत्रकारासोबत सामान्य व्यक्ती कार्यरत असतो आणि सामान्य व्यक्तीची किंमत ही पुढारी आणि नेता यापेक्षा मोठी असते.त्यामुळे अशा पत्रकारास सदैव जनतेची आणि सामान्य नागरिकांची साथ असल्याने त्यास काहीही अडचण येत नाही.वाघे यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या जीवनात आलेल्या अडचणी विशद केल्या.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गर्जे,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अतुल कोरपे,शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुधीर बिंदु,गणेश पाटील,भाजपा तालुका सरचिटणीस मल्लिकार्जुन सौंदळे,राजेश खेडकर यांनी आपले मनोगते व्यक्त करत सत्कारमूर्तींना शुभेछ्या दिल्या.यावेळी या कार्यक्रमास पत्रकार संघाचे सचिव मंजूर मुल्ला,सुभाष सुरवसे,शिवाजी कुंभारीकर,वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर पोटे,यांच्यासह तालुक्यातील पत्रकार,वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती,कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शिवमल्हार वाघे यांनी केले तर सूत्रसंचालन ग्रंथ व वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें